scorecardresearch

काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाकडून सलमान खानला मोठा दिलासा!

१९९८ साली राजस्थानमध्ये चित्रीकरण करत असताना सलमान खानला काळवीट शिकार केल्याच्या प्रकरणात अटक झाली होती.

salman khan, antelope ,
१९९८ साली राजस्थानमध्ये चित्रीकरण करत असताना सलमान खानला काळवीट शिकार केल्याच्या प्रकरणात अटक झाली होती.

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा २४ वर्षांपूर्वी काळवीट शिकार प्रकरणात दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयात प्रलंबित अपील उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी सलमानने याचिका दाखल केली होती. त्यावर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलासा देत कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सलमान खानच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.

आज सलमानच्या वकिलाने हायकोर्टात आपली संपूर्ण बाजू मांडली. त्यावर उच्च न्यायालयाने निकाल देताना सलमानला मोठा दिलासा दिला. सुनावणीदरम्यान सलमानची बहीण अलविरा कोर्टरूममध्ये उपस्थित होती. कांकणी गावाच्या हद्दीत दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी काजोल होणार तिसऱ्या बाळाची आई? या VIRAL VIDEO वरून चर्चा

आणखी वाचा : ‘सामी सामी’ गाण्याच्या ‘या’ मराठमोळ्या व्हर्जनने घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ! तुम्ही ऐकलत का?

सप्टेंबर १९९८ मध्ये, सलमान राजस्थानच्या जोधपूरमध्ये सूरज बडजात्याच्या यांच्या ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. यावेळी तो चित्रपटातील सहाय्यक अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीला गेला होता. तेथे संरक्षित काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. २८ आणि २८ सप्टेंबर, १ ऑक्टोबर आणि २ ऑक्टोबर रोजी ही शिकार करण्यात आली होती. सलमानला शिकारीसाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्याच्या सह कलाकारांवर होता. त्यानंतर सलमानला अटक करण्यात आली होती.

आणखी वाचा : सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं…

काळवीट शिकारी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. सलमानशिवाय इतर सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी सलमान खानला १२ ऑक्टोबर १९९८ रोजी पहिली अटक झाली होती. पाच दिवसच्या तुरुंगवास झाल्यानंतर १७ ऑक्टोबरला सलमानची जोधपूर तुरुंगातून जामिनावर सुटका झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan big relied from antelope hunting case by rajasthan high court dcp