डान्सच्या बाबतीत सलमानलाही टक्कर देतो बॉडीगार्ड शेरा, व्हिडीओ एकदा पाहाच

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

salman khan, salman khan bodyguard, shera dance video, salman khan bodyguard shera, सलमान खान, शेरा, सलमान खान बॉडीगार्ड, शेरा डान्स व्हिडीओ
सलमान खान प्रमाणेच शेरा देखील सोशल मीडियावर बराच सक्रीय असतो.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. शेरा हा सलमानचा चांगला मित्र देखील आहे. या दोघांमध्ये नेहमीच एक खास बॉन्डिंग दिसून येतं. सलमान खान प्रमाणेच शेरा देखील सोशल मीडियावर बराच सक्रीय असतो. नुकताच त्यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये शेरा डान्स करताना दिसत आहे.

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा सध्या राजस्थानमध्ये आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो काही राजस्थानी फोक डान्सर्ससोबत थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातील ‘दगाबाज’ हे गाणं ऐकू येत आहे आणि शेरा देखील हे गाणं गात त्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यानं लिहिलं, ‘राजस्थान स्वतःच्याच बेस्ट अंदाजात.’

सलमान खान आणि शेरा यांचं नेहमीच एक खास नातं पाहायला मिळालं आहे. एका मुलाखतीत सलमानसोबतच्या बॉन्डिंगबद्दल बोलताना शेरा म्हणाला होता, ‘सलमानची आणि माझी पहिली भेट झाली त्यावेळी मी Whigfield च्या शोची सेक्युरीटी पाहत असे. त्यानंतर मी सलमानला दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा हॉलिवूड अभिनेता Keanu Reeves भारतात आला होता आणि त्यावेळी ‘स्पीड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मी पहिल्यांदा सलमानसाठी चंदीगढमध्ये काम केलं होतं आणि त्यानंतर मी त्याच्यासाठीच काम करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan bodyguard shera dance video goes viral on social media mrj

Next Story
“आपण स्वतःचं मूळ विसरतोय त्यामुळं…”; दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशानंतर शरद केळकरनं व्यक्त केली भीती
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी