scorecardresearch

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता कोण? सलमान खान म्हणतो…

यावेळी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता कोण? असा प्रश्न रणवीरने सलमानला विचारला.

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता कोण? सलमान खान म्हणतो…

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी अद्यापही तो हँडसम हक म्हणूनच ओळखला जातो. सलमानचे जगभरात लाखो चाहते आहेत आणि त्यात मुलींची संख्या ही जास्त आहे. ज्या सलमानचे जगभरात लाखो चाहते आहेत, तो मात्र बॉलिवूडमधील फक्त एका अभिनेत्याला फॉलो करतो. विशेष म्हणजे तो अभिनेता फारच सुंदर आहे, अशीही कबुली त्याने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान दिली आहे.

सलमान खानचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतंच सलमानने अभिनेता रणवीर सिंहच्या बिग पिक्चर या शो मध्ये हजेरी लावली. यावेळी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि देखणा अभिनेता कोण? असा प्रश्न रणवीरने सलमानला विचारला.

यावर सलमानने क्षणार्धात उत्तर दिले, “बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर आणि देखणे अभिनेते आहेत. मी नेहमीच धर्मेंद्र यांना फॉलो करतो. ते फार निरागस आहेत आणि त्यांची निरागसता चेहऱ्यावर झळकते. ते फार सुंदर व्यक्तीमत्त्व आहेत. मी त्यांचा चाहता आहे,” असे सलमान म्हणाला.

यावेळी लगेचच रणवीरने धर्मेंद्रना माचो मॅन असे संबोधले. यावर सलमान धर्मेंद्र यांची नक्कल करत म्हणाला, माझी चेष्टा करु नका, मे तेरा खून पी जाऊंगा, असे त्याने गमतीत म्हटले. सलमानने धर्मेंद्र यांचा चित्रपटातील हा संवाद ऐकून अक्षरश: उड्या मारल्या.

दरम्यान या संपूर्ण शोचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेते धर्मेंद्र यांना कौतुक ऐकून खूप आनंद झाला आणि त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “प्रिय सलमान, तू माझ्याबद्दल जी प्रेमळ टिप्पणी केली आहेस, त्यासाठी माझ्याकडून खूप खूप प्रेम. मात्र आता मी जुना झालो आहे. आता तू बॉलिवूडचा सर्वात देखणा अभिनेता आहेस. तुझ्या साधेपणामुळे तू नेहमी मला आवडतोस. नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे,” असे धर्मेंद्र म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2021 at 14:22 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या