बॉलिवूडचा किंग खान म्हणून अभिनेता शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख खान हा सध्या त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. यात शाहरुख खानच्या स्टाईलचे सर्वजण कौतुक करत आहे. नुकतंच शाहरुख खानचा मित्र आणि अभिनेता सलमान खान याने ‘पठाण’ चित्रपटाबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. नुकतंच यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा यांनी सलमान खानला ‘पठाण’चे एक फुटेज दाखवले आहे. त्यानंतर सलमान खानने शाहरुख खानच्या ‘पठाण’बद्दल त्याचे मत सांगितले आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या एका वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी आदित्य चोप्रा आणि सलमान खान एकत्र भेटले होते. त्यावेळी त्यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा सुरु होती. सलमान खानचा आगामी टायगर ३ आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ या दोन्हीही चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहे. नुकत्याच झालेल्या एका भेटीदरम्यान आदित्य चोप्रा यांनी सलमान खानला ‘पठाण’ चित्रपटातील एक २० मिनिटांचे दृश्य असलेला व्हिडीओ दाखवला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमान खानला काय वाटते, हे त्यांना जाणून घ्यायचे होते.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराहला षटकार मारल्यावर आशुतोष शर्माचा आनंद गगनात मावेना! सामन्यानंतर म्हणाला….
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

आदित्य चोप्राने सलमानला ‘पठाण’ चित्रपटातील २० मिनिटांचा व्हिडीओ दाखवल्यानंतर सलमान हा फारच उत्साहित झाला. त्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल. तसेच हा ब्लॉकबस्टर चित्रपट असेल, असे सलमानने सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पठाण’चा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमान खानने शाहरुख खानला फोन केला. यावेळी त्याने शाहरुख खानला सांगितले की, तुझा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल. हा चित्रपट फारच प्रभावी आहे. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम बनवले. तसेच यातील अॅक्शन हे जबरदस्त आहेत, असेही सलमानने सांगितले.

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ‘पठाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि जॉन ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

सलमान खान करणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, फोटो शेअर करत चिरंजीवी म्हणाले…

शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.