Video : विसर्जन मिरवणुकीत सलमानचा जबरदस्त डान्स

सलमान खानचे ‘खान’दान मोठ्या थाटात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करते. त्यांच्या घरी दीड दिवस बाप्पाची साग्रसंगीत पूजा केली जाते.

salman khan
स्वरा भास्करसोबत सलमानचा डान्स

गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आवडीचा. आपले बॉलिवूडकरही हा सण अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यात सलमान खानचे ‘खान’दान मोठ्या थाटात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करते. त्यांच्या घरी दीड दिवस बाप्पाची साग्रसंगीत पूजा केली जाते. यावेळी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच सेलिब्रिटी बाप्पाच्या दर्शनासाठी गॅलेक्सी अपार्टमेंट येथे जातात. गेल्या दोन वर्षांपासून खान कुटुंबाने त्यांच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मुलगी अर्पिता खान शर्मा हिच्या घरी केली आहे. मंगळवारी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत बॉलिवूडच्या ‘भाईजान’चा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला.

सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ढोल-ताशांच्या गजरात सलमानसह अभिनेत्री स्वरा भास्कर व डेझी शाह थिरकताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडीओत भाची अलिझेह अग्निहोत्रीसह सलमान डान्स करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B19gyqmAjZy/

https://www.instagram.com/p/B19Ww40nzAN/

https://www.instagram.com/p/B19i0b9nJ9Q/

https://www.instagram.com/p/B19iq5CH0fX/

आणखी वाचा : बाप्पासाठी सोनाली बेंद्रेनं केले उकडीचे मोदक 

गणरायाचे आगमन, त्याच्यासाठी करण्यात येणारी सजावट, दर्शनाला येणारे सेलिब्रिटी तसेच विसर्जनाला असणारा जल्लोष यासह प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. अर्पिताच्या घरी गणपती दर्शनासाठी सोनाक्षी सिन्हा, डिनो मोरिया, नेहा धुपिया, अंगद बेदी, डेझी शाह, स्वरा भास्कर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan dances his heart out at arpita ganesh visarjan watch the videos ssv

ताज्या बातम्या