scorecardresearch

VIDEO: ‘अंतिम’ प्रदर्शित होताच चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच फोडले फटाके, सलमान खान म्हणतो…

अभिनेता सलमान खानचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी सिनेमागृहातच फटाके फोडत आपला आनंद साजरा केला.

VIDEO: ‘अंतिम’ प्रदर्शित होताच चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच फोडले फटाके, सलमान खान म्हणतो…

अभिनेता सलमान खानचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी सिनेमागृहातच फटाके फोडत आपला आनंद साजरा केला. अंतिम चित्रपटामध्ये सलमान फायटिंग करतानाचे दृष्य दिसत असताना त्याच्या चाहत्यांनी एका सिनेमागृहात फटाके फोडल्याचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ स्वतः सलमान खानने इंस्टाग्रामवर शेअर करत त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

सलमान खानने सिनेमागृहांमध्ये अशा प्रकारे फटाके फोडण्याची गंभीर दखल घेत चाहत्यांना त्याचे किती जीवघेणे परिणाम होऊ शकतात याची कल्पना देत हे न करण्याचं आवाहन केलं. तसेच सिनेमागृहाच्या मालकांनाही चाहत्यांना असं करू न देण्याबाबत सूचना केलीय.

सलमान खान म्हणाला, “मी माझ्या चाहत्यांनी विनंती करतो की त्यांनी सिनेमागृहात जाताना फटाके नेऊ नये. असं करणं मोठ्या आगीला कारणीभूत ठरू शकते आणि त्यामुळे तुमच्यासह इतरांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.”

हेही वाचा : Bigg Boss 15 :वाइल्ड कार्ड एण्ट्री अभिजीत बिचुकले विषयी ऐकूण सलमान झाला थक्क!

“माझी सिनेमागृह मालकांनाही विनंती आहे की त्यांनी दर्शकांना सिनेमागृहात फटाके नेऊ देऊ नये. तसेच सुरक्षा रक्षकांनी चाहत्यांना प्रवेश द्वारावरच रोखावे. सिनेमाचा सर्व अंगांनी आनंद घ्या, पण हा प्रकार टाळा अशी सर्व चाहत्यांनी विनंती,” असंही सलमानने नमूद केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2021 at 08:57 IST

संबंधित बातम्या