मामाच्या कडेवर छोट्या आयतची मस्ती, सलमानच्या ‘त्या’ व्हिडीओची सर्वत्र चर्चा

तो त्यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत असतो.

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. सलमान खान नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. नुकतंच सलमा.नचा एक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहे. यात सलमान त्याच्या लाडक्या भाचीसोबत मजामस्ती करताना दिसत आहे.

सलमान खानने स्वत: हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात सलमान हा माकडांना केळी आणि अन्य गोष्टी देताना दिसत आहेत. त्यासोबतच तो त्या माकडांसोबत बोलत असल्याचेही दिसत आहे. यानंतर तो त्याची भाची आयत हिला कडेवर घेऊन माकडांसोबत मजा करताना दिसत आहे.

मला सलमानसोबत काम करायचे नव्हते पण…; आयुष शर्माचा धक्कादायक खुलासा

तसेच तिच्याही हातात केळी देत तो माकडांना द्यायला सांगत आहे. विशेष म्हणजे आयतही माकडांना पाहून टाळ्या वाजवत आहे. तसेच ती फार खूश असल्याचे दिसत आहे. लाडक्या मामासह माकडांसोबत मजामस्ती करण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. दरम्यान सलमानने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्या दोघांच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

आयत ही सलमान खानची बहिण अर्पिताची मुलगी आहे. तिचा जन्म सलमानच्या वाढदिवशी म्हणजे २७ डिसेंबर रोजी झाला. सलमान हा भाची आयत आणि भाचा आहिल या दोघांवरही जीवापाड प्रेम करतो. तो त्यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर करत असतो.

सलमान खानचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan feeding bananas to monkeys with his niece aayat video viral on internet nrp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या