कतरिना कैफ व्यतिरिक्त इन्स्टाग्रामवर या ६ अभिनेत्रींना फॉलो करतो सलमान खान

कोट्यावधी लोक ज्या सलमान खानला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात तो सलमान स्वतः केवळ २७ लोकांनाच फॉलो करतोय.

salman-khan-katarina-kaif
(Photo: YRF)

करोना परिस्थितीमुळे फिल्म इंडस्ट्रीमधलं काम थंडावलंय, तर दुसरीकडे चित्रपट सुद्धा क्वचितच रिलीज होताना दिसून येत आहेत. त्यामूळे बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान हा त्याच्या सोशल मीडियावर बरचा सक्रिय असतो. तो त्याच्या सोशल मीडियावर वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असतो. त्याच्या पोस्टवर लाखोंच्या संख्येने फॅन्स सुद्धा कमेंट्स आणि लाइक करत असतात. इन्स्टाग्रामवर सलमान खानचे तब्बल 42 मिलियन इतके फॉलोअर्स आहेत.

सलमान त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कधी पनवेलमधल्या फार्म हाऊसवर धमाल मस्ती करतानाचे व्हिडीओज तर कधी वर्कआऊट करतानाचे फोटोज शेअर करत असतो. सोशल मीडियावर त्याचे प्रत्येक फॅन्स त्याच्या नव नव्या पोस्टच्या प्रतिक्षेत असतात. सलमानने पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्या व्हायरल सुद्धा होत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

कोट्यावधी लोक ज्या सलमान खानला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात तो सलमान स्वतः केवळ २७ लोकांनाच फॉलो करतोय. या २७ लोकांच्या यादीत फक्त सात अभिनेत्री आहेत. या अभिनेत्रींपैकी एक कतरिना कैफ आहे. हे दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. सोबतच ‘टायगर जिंदा है’ सारख्या अनेक चित्रपटात दोघांनी एकत्र स्क्रिन देखील शेअर केलीय. नुकतंच कतरिनाच्या वाढदिवशी सलमान खानने तिला शुभेच्छा सुद्धा दिल्या.

कतरिना कैफ व्यतिरिक्त सलमान खान आणखी सहा अभिनेत्रींना फॉलो करतो. या सहा अभिनेत्रींमध्ये संगीता बिजलानी, डेजी शाह, वलूशा डी सूजा, जॅकलीन फर्नांडिस, यूलिया वंतूर आणि इसाबेल कैफ यांचा समावेश आहे. या अभिनेत्रीं व्यतिरिक्त आपल्या कुटुंबातील सदस्यांना फॉलो करतो. यात त्याचा भाऊ अरबाज खान, सोहेल खान, बहिण अर्पिता खान शर्मा, अलवीरा अग्निहोत्री आणि मेव्हणा अतुल अग्निहोत्री यांची नावं आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman khan follows 6 other bollywood actresses on instagram katrina kaif prp