भन्नाट किस्सा : दिग्दर्शकाच्या गर्लफ्रेंडला पटवण्याच्या प्रयत्नात सलमान मिळाली पहिली जाहिरात

खुद्द सलमाननेच सांगितला हा किस्सा

Salman Khan
सलमान खान

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानच्या करिअरची सुरुवात कशी झाली हे फार क्वचित लोकांना माहित असेल. त्याला मिळालेल्या पहिल्या जाहिरातीचा भन्नाट किस्सा त्याने स्वत: नुकत्याच एका शोमध्ये सांगितला. ‘द तारा शर्मा शो’ या कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती.

दिग्दर्शक कैलाश सुरेंद्रनाथ यांनी सलमानला पहिल्या जाहिरातीची ऑफर दिली होती. नंतर त्याचं करिअर घडवण्यात कैलाश यांनी एका शिक्षकासारखी भूमिका बजावली. त्या जाहिरातीचा किस्सा सांगताना सलमान म्हणाला, “सी रॉक क्लब येथे मी स्विमिंग करत होतो आणि तिथं लाल रंगाची साडी परिधान केलेली एक सुंदर तरुणी पूलच्या बाजूने जात होती. तिला पटवण्याच्या नादात मी पूलमध्ये पाण्याखाली गेलो आणि वेड्यासारखा अंडरवॉटर स्विमिंग करत होतो. जेव्हा पूलच्या दुसऱ्या बाजूला पोहोचलो आणि पाण्याच्या वर डोकं काढलं तेव्हा ती तिथे नव्हती. दुसऱ्याच दिवशी मला ‘फार प्रॉडक्शन्स’मधून कॉल आला आणि त्यांनी कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीची ऑफर दिली. मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या काकीसोबत मी दिग्दर्शक कैलाश यांना भेटायला गेलो. त्यांना होकार कळवला आणि माझा नंबर कसा मिळाला हे विचारलं. ते म्हणाले की, ज्या मुलीला तू पटवण्याचा प्रयत्न करत होतास, ती माझी गर्लफ्रेंड आहे. तू खूप छान पोहतोस असं तिने मला सांगितलं. आम्ही जाहिरातीची शूटिंग मालदिवमध्ये करणार आहोत आणि अंडरवॉटर स्विमिंग करता येईल असाच तरुण आम्हाला हवा होता.” या जाहिरातीच्या माध्यमातून सलमान पहिल्यांदा कॅमेरासमोर गेला होता.

आणखी वाचा – चौथीत असताना सलमानची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली होती; कारण…

सलमानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर दाक्षिणात्य स्टार सुदीप किच्चा खलनायकाच्या भूमिकेत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan got his first ad while trying to impress a girl reveals she was the director girlfriend ssv

ताज्या बातम्या