सलमान खानची ग्रॅण्ड ईद पार्टी

सलमानच्या ईद पार्टीला अनेक सिनेतारकांची उपस्थिती

salman khan
सलमान खान

बॉलिवूडच्या ‘सुलतान’साठी म्हणजेच सलमान खानसाठी ईद हा सण खूप विशेष असतो. मागील सात वर्षांत ईदच्या मुहूर्तावर सलमानने चाहत्यांसाठी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट आणले. यावर्षीसुद्धा ईदच्या निमित्ताने सलमानचा ‘ट्युबलाइट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच्या चाहत्यांसाठीही हा ईद तेवढाच महत्त्वाचा असतो कारण यादिवशी आपल्या आवडत्या अभिनेत्याची झलक त्यांना पाहायला मिळते. ईदच्या दिवशी संध्याकाळी सलमान आपल्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेण्टबाहेर चाहत्यांना भेटण्यासाठी आला. यावेळी सलमानने निळ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते.

ईदच्या निमित्ताने सलमानने त्याच्या घरी एक मोठी पार्टीसुद्धा ठेवली होती. त्याच्या अनेक मित्र-मैत्रिणी, कुटुंबिय, सेलिब्रिटीसुद्धा या पार्टीला उपस्थित होते. यामध्ये मलायका अरोरा आणि तिची बहिण अमृता अरोरा, सलमानची कथित प्रेयसी लुलिया वंतूर, जॅकलिन फर्नांडिस, प्रिती झिंटा, दिया मिर्झा, दिव्या खोसला, मनिष पॉल आणि डेझी शाह या कलाकारांनी हजेरी लावली. सोशल मीडियावर सलमानच्या घरातील या पार्टीची झलक पाहायला मिळाली. सलमान आणि त्याच्या कुटुंबियांसाठी हा एक विशेष क्षण होता.

whatsapp-image-2017-06-26-at-5-47-24-pm whatsapp-image-2017-06-26-at-5-47-29-pm whatsapp-image-2017-06-26-at-5-47-32-pm

https://www.instagram.com/p/BV0388ZgLtc/

https://www.instagram.com/p/BV0FD9NAqz3/

https://www.instagram.com/p/BV1faC4go3Z/

https://www.instagram.com/p/BVwEuZ-gF-V/

वाचा : स्वतःचं घर घेण्यासाठी सलमानला कमी पडताहेत पैसे!

बॉक्स ऑफिसवर समाधानकारक यश न मिळवू शकलेल्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाबद्दल सलमानला विचारले असता तो म्हणाला की, ‘मी तर या चित्रपटासाठी वजा ३ आणि वजा ४ अशा रेटिंगची अपेक्षा करत होतो मात्र समीक्षकांनी १ आणि २ इतके स्टार दिले. त्याबद्दल मी संतुष्ट आहे.’ तर ‘ट्युबलाइट’मधील सलमानचा सहकलाकार आणि भाऊ सोहेल खान यावेळी म्हणाला की, ‘दरवर्षी नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत असल्याने हा ईदसुद्धा आमच्यासाठी खूप विशेष आहे. मात्र ईदच्या दिवशी आम्ही घरी चित्रपटांविषयी चर्चा करत नाही. एकत्र मिळून आनंदाने हा सण साजरा करण्याचा दिवस आहे.’ ईदच्या दिवशी जेव्हा सर्व कुटुंबिय आणि मित्रपरिवार एकत्र येतात तेव्हा तो क्षण ‘भाईजान’ सलमानसाठी खूप विशेष असतो. ‘ट्युबलाइट’च्या यशाबद्दल फार चिंता न बाळगता सलमान निवांतपणे कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यातच समाधानी आहे असं म्हणायला हरकत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan grand eid celebration with family and fans