सलमान म्हणतो, फॅन असावा तर असा..

आताच्या पिढीत प्रामाणिकपणा, आदर आणि संस्कार आहेत.

गेल्याच आठवड्यात अभिनेता अक्षय कुमारसोबत फोटो काढू इच्छित असलेल्या एका चाहत्याला त्याच्या सुरक्षारक्षकाने थोबाडीत मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर आपल्या सुरक्षारक्षकाच्या या वर्तनासाठी अक्षयने माफीदेखील मागितली. पण असे काही घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कधी कधी अतिउत्सुक चाहत्यांच्या वर्तनामुळे कलाकार भडकतात किंवा त्यांचे सुरक्षारक्षक चाहत्यांना फटकारताना दिसतात.
यासगळ्यात चाहत्यांचा सन्मान करणारी एक घटना घडली आहे. या चाहत्याचा फोटो सलमानने स्वतः ट्विटरवर पोस्ट केला आहे. याविषयी सलमानने लिहलयं की, विमानतळावर जेव्हा लोक फोटो घेण्यात व्यस्त होते. त्यावेळी हा मुलगा एके ठिकाणी शांत उभा होता आणि त्याने फोटोसाठी विनंती केली. या मुलाचे खूप चांगले पालनपोषण करण्यात आलेले आहे. याच्यासोबत फोटो काढून मी खूश आहे. याच्याकडून शिका. त्याने पुढे लिहले आहे की, आताच्या पिढीत प्रामाणिकपणा, आदर आणि संस्कार आहेत. देव त्यांचे भलं करो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan impressed with this young fan

ताज्या बातम्या