शाहरुखच्या ‘फॅन’मध्ये सलमानचा कॅमिओ!

अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षितही दिसले.

अभिनेता शाहरुख खान याचा फॅन चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. आज बॉलीवूडमध्ये चर्चा आहे ती केवळ आणि  केवळ फॅन चित्रपटाची. पण त्याचसोबत आणखी एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने या चित्रपटात कॅमिओ केल्याचे कळते.


ब-याच वर्षांनी जवळ आलेले हे दोन मित्र फॅनच्या निमित्ताने एकत्र एकाच चित्रपट झळकल्याने त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. पण तुमचा हा आनंद जास्त काळ टिकणार नाही. कारण या चित्रपटात खुद्द सलमानने भूमिका केलेली नाही. तर यात केवळ सलमानचा मेणाचा पुतळा दाखविण्यात आला आहे. याचसोबत अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांचेही मेणाचे पुतळे चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. एप्रिल सुरु होऊन अर्धा महिना झाला. पण हे ट्विट नक्कीच सगळ्यांना एप्रिल फूल करणारे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman khan is in fan