salman khan latest post about his upcoming film bhaijaan avn 93 | अभिनेता सलमान खानचा नवा 'भाईजान' लूक व्हायरल : चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक! | Loksatta

अभिनेता सलमान खानचा नवा ‘भाईजान’ लूक व्हायरल : चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्काच दिला आहे.

अभिनेता सलमान खानचा नवा ‘भाईजान’ लूक व्हायरल : चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक!
सलमान खान भाईजान चित्रपट | salman khan bahijaan movie

सध्या सोशल मीडियावर ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर खान आणि अक्षय कुमारचे चित्रपट बॉयकॉट केल्यानंतर प्रेक्षक आता बॉलिवूडच्या आगामी चित्रपटांनादेखील बॉयकॉट करा अशी मागणी करताना दिसत आहेत. आमिरच्या सिनेमाचं कौतुक करणाऱ्या हृतिक रोशनच्या आगामी सिनेमालासुद्धा असंच टार्गेट केलं गेलं. शाहरुख खानचे पुढचे तिनही चित्रपट बॉयकॉट करण्यासाठी नेटीजन्स पुढे सरसावले आहेत. अशातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्काच दिला आहे.

सलमानने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. लेह-लडाखच्या परिसरात शूट केलेल्या या फोटोत सलमान त्याच्या नवीन लूकमध्ये दिसत आहे. त्याने त्याचे केस वाढवले आहेत. बाजूला एक मोटर सायकल आहे आणि सलमान पाठमोरा उभा आहे. असं म्हंटलं जात आहे की हा सलमानचा आगामी चित्रपट ‘भाईजान’ मधला नवीन लूक आहे. सलमानने त्याच्या ‘टायगर ३’ चं चित्रीकरण पूर्ण केलं असून तो आता ‘भाईजान’साठी तयारी करत असल्याचं स्पष्ट होत आहे. नुकतंच सलमान आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांना मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार सलमान आणि पूजा हे ४ दिवस लेह-लडाखमध्ये चित्रीकरण करणार आहेत. त्यानंतर या चित्रपटातले काही महत्वाचे सीन्स मुंबईमध्ये शूट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सलमानच्या या चित्रपटाचं चित्रीकरण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय हा चित्रपट याच वर्षी डिसेंबरच्या दरम्यान प्रदर्शित करायचं सलमानच्या मनात आहे. सलमान पूजाबरोबरच या चित्रपटात वेंकटेश आणि जगपती बाबूसुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार असून याआधी त्यांनी हाऊसफूल ३ आणि ४ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. शिवाय केजीफ आणि सलमानच्या ‘अंतिम’सारख्या चित्रपटांना संगीत देणारे रवी बसरूर हे या चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासाठी काम करणार आहेत. एकंदरच सलमानच्या इतर चित्रपटांपैकी हा चित्रपटदेखील एक कमर्शियल मसालापट असणार आहे. चित्रपटातल्या २ खास गाण्यांचं चित्रीकरण हैद्राबादमध्ये झालं आहे. त्यापैकी एका गाण्यात साऊथचा लोकप्रिय अभिनेता राम चरणची झलकसुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. सलमानच्या ‘टायगर ३’ आणि या ‘भाईजान’साठी त्याचे चाहते खूप उत्सुक असल्याचं चित्र दिसत आहे.

आणखीन वाचा : ‘जोपर्यंत हे किंग, बादशाह आणि सुलतान…’, विवेक अग्निहोत्रीने बॉलिवूडच्या Khans वर अप्रत्यक्ष टीका

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Raju Shrivastav Health Update: चिंता वाढवणारी बातमी! एहसान कुरेशी म्हणाले, “एखादा चमत्कारच…”

संबंधित बातम्या

दिग्दर्शक रवी जाधव अडकला पुन्हा लग्नबंधनात; व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण
“आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
हंसिका मोटवानीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ; जंगी विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल
“हिरोला नग्न दाखवू शकत नाही पण स्त्रीला नग्न दाखवले तर…”; स्मिता पाटील यांचं ‘ते’ बोल्ड विधान पुन्हा चर्चेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
धक्कादायक: प्रेषित म्हणवणाऱ्या या गृहस्थाला २० पत्नी; आपल्याच कोवळ्या मुलीशीही केला विवाह
शशी थरूर यांना थेट राष्ट्रवादीकडून ऑफर, म्हणाले “पक्षात येण्याची… “
Video: पारंपरिक थाट, शाही सोहळा अन् समुद्रकिनारा; अभिनेत्याचा वेडिंग व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय
“ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच, आज केवळ…”, भाजपाचा मोठा दावा
बापरे! एक शिंक आली अन् मृत्यूनं गाठलं, मित्रांसोबत गप्पा मारताना नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा Viral Video पाहा