scorecardresearch

“माझ्या भावांनी हिंदूशी लग्न केले”, मानहानीच्या दाव्यावर सलमानच्या वकीलांनी दिली उत्तर

सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्कर यांच्यातील भांडण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

salman khan, salman khan brothers,
सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्कर यांच्यातील भांडण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि त्याच्या शेजाऱ्यांमध्ये भांडण सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दिवसेंदिवस हे प्रकरण गंभीर होत चालले आहे. सलमानने शेजाऱ्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत सलमानची बाजू मांडणाऱ्या प्रदीप गांधी या वकिलाने सांगितले की, त्याचे शेजारी विनाकारण त्याचा धर्म या भांडणात आणत आहे. सलमान खानच्या फार्महाऊसशेजारी प्लॉट घेणाऱ्या केतन कक्करने एका यूट्यूब चॅनलवर अनेक आरोप केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. यानंतर सलमानच्या वतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खरं तर, १९९५ मध्ये, केतनने घर/आश्रम/मंदिर बांधण्याच्या उद्देशाने पनवेलमध्ये जमीन खरेदी केली होती. प्रदीप गांधी म्हणाले की, “ही जमीन महाराष्ट्र सरकारने रद्द केली आहे, ती जमीन बेकायदेशीर असल्याचे वनविभागाने मानले आहे.” पण केतनने दावा केला की “हे सर्व सलमानच्या सूचनेनुसार घडले आहे, त्याने ही जमीन बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यानंतरच ती वनविभागाने रद्द केली होती.”

केतनने दावा केला की सलमानने कथितरित्या एक गेट बांधला आणि हा त्याचा एकमात्र मार्ग होता जिथून तो एण्ट्री करायचा आणि बाहेर यायचा. त्याने पुढे सलमानवर इको-फ्रेंडली गणेश मंदिर बांधण्याचा आरोप केला आणि या मंदिरातील प्रवेशावर सलमानने रोख लावल्याचे तो म्हणाला.

आणखी वाचा : “…कारण माझे ब्रेस्ट मोठे नाहीत”, नीना गुप्ताच्या उत्तराने कपिल शर्माची बोलती बंद

यावर सलमानने प्रत्युत्तर दिले आहे. “या सर्व आरोपांचा कोणताही पुरावा नाही. मालमत्तेच्या वादात तुम्ही माझी वैयक्तिक प्रतिमा का खराब करत आहात? तुम्ही माझ्या धर्मात का ढवळाढवळ करत आहात? माझी आई हिंदू आहे, माझे वडील मुस्लिम आणि माझ्या भावांनीही हिंदूशी लग्न केले आहे. आम्ही सर्व सण साजरे करतो”, असे सलमानने आपल्या वकिलांमार्फत म्हटले आहे.

आणखी वाचा : अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची बातमी ऐकून सुनील शेट्टी संतप्त, म्हणाले…

“तू एक सुशिक्षित व्यक्ती आहेस. असे आरोप करायला गुन्हेगार नाहीस. आजकाल सर्वात सोपी गोष्ट म्हणजे काही लोकांना एकत्र करणे आणि सोशल मीडियावर राग व्यक्त करणे. माझी राजकारणात जाण्याची इच्छा नाही,” असेही सलमान पुढे म्हणाला आहे. सलमानने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘यूट्यूबरशी बोलताना केतनने त्याच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली होती.’

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

मुंबईतील वांद्रे उपनगरात राहणाऱ्या सलमान खानचे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे फार्महाऊस आहे. मुंबईचे रहिवासी असलेले कक्कड सलमान खानच्या फार्महाऊसशेजारी एका टेकडीवरील प्लॉटचे मालक आहेत. सलमानच्या दाव्यानुसार, केतनने युट्युबरशी बोलताना त्याच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती.

सलमान खानने यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि गुगल सारख्या सोशल मीडिया साइट्सलाही पक्षकार बनवले आहेत आणि त्यांना त्यांच्या वेबसाइट्सवरून बदनामीकारक मजकूर काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. केतन यांना सलमान किंवा त्याच्या फार्महाऊसबद्दल बदनामीकारक मजकूर प्रकाशित करण्यापासून रोखणारा कायमचा आदेश देण्यात यावा अशी सलमानची मागणी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan lawyer argues defamation case says my brothers got married to hindus why bring in religion here dcp

ताज्या बातम्या