scorecardresearch

सलमान खानची भाची अलीजे करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री!

अलीजे अग्निहोत्री ही सलमाची मोठी बहिण अलिविरा आणि निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.

सलमान खानची भाची अलीजे करणार बॉलिवूडमध्ये एण्ट्री!
अलीजे अग्निहोत्री ही सलमाची मोठी बहिण अलिविरा आणि निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबातील जवळपास सगळेच चित्रपटसृष्टीत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. आता त्याच्या कुटुंबातील आणखी एक व्यक्ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमानची भाची अलीजे अग्निहोत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अश्या चर्चा सुरु आहेत. एड फीचर फिल्माच्या चित्रीकरणावेळी अलीजे तिथे दिसली म्हणून या सगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

अलीजेने ज्वेलरीसाठी पहिले फोटोशूट केले होते. या जाहिरातीसाठी केलेल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अलीजेचा जाहिरातीतील लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळे आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करेल अशी चर्चा सुरु झाली आहे. अलीजे ही सलमानची मोठी बहीण अलिविरा आणि निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.

आणखी वाचा : Big Boss Marathi 3 : वेदनांनी विव्हळत होतो, शरीरभर नळ्या होत्या… महेश मांजरेकरांनी सांगितला तो अनुभव

 

View this post on Instagram

 

A post shared by ZAAVORR (@zaavorr)

आणखी वाचा : मुलाच्या वाढदिवशी ट्विंकल खन्नाची खास पोस्ट, म्हणाली..

अलीजेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचे लाखो चाहते आहेत. अलीजे या आधी सीमा खानच्या मॉडेलिंग असायनमेंट्समध्ये दिसली होती. अलीजे सरोज खान यांच्या डान्स क्लासला देखील जात होती. सध्या ती बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्यासाठी तयार होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या