सलमान खानचं शेजाऱ्याशी पटेना; प्रकरण थेट कोर्टात! नक्की काय झालं? जाणून घ्या…

सलमान खाननं त्याच्या शेजाऱ्याविरोधात म्हणजेच केतन कक्कर विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Salman khan after snake bite front media on his birthday
(फोटो : Varinder Chawla)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. तो आपल्या पनवेल इथल्या फार्महाऊसमधले फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. लॉकडाउनमध्येही सलमान त्याच्या या पनवेल इथल्या घरामध्ये राहत होता. तिथल्या एक शेजाऱ्याविरोधात सलमानने तक्रार दाखल केली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खाननं त्याच्या शेजाऱ्याविरोधात म्हणजेच केतन कक्कर विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यानं म्हटलं आहे की, सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला. यावर बंदी घातली पाहिजे.

केतन कक्कर यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टाला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. केतन कक्कर यांनी यूट्यूब चॅनेलवरून सलमानबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केला. हा दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयानं कक्कर यांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात पुढची सुनावणी २१ जानेवारीला होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan panvel farm house case against neighbor vsk

ताज्या बातम्या