अभिनेता सलमान खान आणि त्याचा शेजारी यांच्यातील भांडण सध्या चर्चेत आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण गंभीर होत चालले आहे. सलमानने शेजाऱ्यावर मानहानीचा दावा ठोकला आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत सलमानची बाजू मांडणाऱ्या वकिलाने सांगितले की, त्याचा शेजारी विनाकारण त्याचा धर्म या भांडणात आणत आहे. सलमान खानच्या फार्महाऊसशेजारी प्लॉट घेणाऱ्या केतन कक्करने एका यूट्यूब चॅनलवर अनेक आरोप केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. यानंतर सलमानच्या वतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्कर यांच्यातील भांडण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. लाइव्ह लॉच्या वृत्तानुसार, सलमानचे वकील प्रदीप गांधी यांनी गुरुवारी कोर्टासमोर केतन कक्करची पोस्ट आणि मुलाखत वाचून दाखवली. सलमानचा डी गँगच्या लोकांसोबत संबंध असल्याचा केतनचा आरोप आहे. त्याने सलमानच्या धर्मावरही भाष्य केले. तसेच सलमान केंद्रातील पक्ष आणि राज्य पातळीवरील राजकारण्यांच्या जवळ असल्याचेही त्यांनी सांगितले. तर सलमान चाइल्ड ट्रॅफिकिंगमध्ये गुंतलेला असून त्याच्या फार्म हाऊसवर चित्रपट कलाकारांचे मृतदेह पुरले जातात, असे केतन यांनी म्हटले आहे.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

यावर सलमान खानने प्रत्युत्तर दिले आहे. या सर्व आरोपांचा कोणताही पुरावा नाही. मालमत्तेच्या वादात तुम्ही माझी वैयक्तिक प्रतिमा का खराब करत आहात? तुम्ही माझ्या धर्मात का ढवळाढवळ करत आहात? माझी आई हिंदू आहे, माझे वडील मुस्लिम आणि माझ्या भावांनीही हिंदूशी लग्न केले आहे. आम्ही  सर्व सण साजरे करतो, असे सलमानने आपल्या वकिलांमार्फत म्हटले आहे.

“तू एक सुशिक्षित व्यक्ती आहेस. असे आरोप करायला गुन्हेगार नाहीस. आजकाल सर्वात सोपी गोष्ट म्हणजे काही लोकांना एकत्र करणे आणि सोशल मीडियावर राग व्यक्त करणे. माझी राजकारणात जाण्याची इच्छा नाही,” असेही सलमानने पुढे म्हटले आहे. सलमानने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, यूट्यूबरशी बोलताना केतनने त्याच्यावर आक्षेपार्ह कमेंट केली होती.

मुंबईतील वांद्रे उपनगरात राहणाऱ्या सलमान खानचे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे फार्महाऊस आहे. मुंबईचे रहिवासी असलेले कक्कड सलमान खानच्या फार्महाऊसशेजारी एका टेकडीवरील प्लॉटचे मालक आहेत. सलमानच्या दाव्यानुसार, केतनने युट्युबरशी बोलताना त्याच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती.

सलमान खानने यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि गुगल सारख्या सोशल मीडिया साइट्सलाही पक्षकार बनवले आहेत आणि त्यांना त्यांच्या वेबसाइट्सवरून बदनामीकारक मजकूर काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. केतन यांना सलमान किंवा त्याच्या फार्महाऊसबद्दल बदनामीकारक मजकूर प्रकाशित करण्यापासून रोखणारा कायमचा आदेश देण्यात यावा अशी सलमानची मागणी आहे.