सलमानच्या ‘राधे’मध्ये जॅकलिनची एण्ट्री, ‘दिल दे दिया है’ गाणे प्रदर्शित

हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बxहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत होता. त्यानंतर चित्रपटातील ‘सिटी मार’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. आता चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिसत आहे.

‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटातील नव्या गाण्याचे नाव ‘दिल दे दिया है’ असे आहे. या गाण्याचा टीझर काल प्रदर्शित करण्यात आला होता. या गाण्यात जॅकलिन दिसत असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. सलमानच्या या चित्रपटात जॅकलिन ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिले असून शब्बीर अहमद याचे गीतकार आहेत. हे गाणे, कमाल खान आणि पायल देव यांनी गायले असून शबीना खानने कोरियोग्राफ केले आहे.

गाण्यामध्ये जॅकलिन आणि सलमानची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या गाण्याबाबत बोलताना जॅकलिन म्हणाली, “जेव्हा पण सलमान आणि मी एकत्र काम करत असतो, तेव्हा ते सर्वोत्तम असते. त्याची एनर्जी दमदार असते. राधेमधील ‘दिल दे दिया’ माझे आवडते गाणे आहे. हे माझ्या आधीच्या गाण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. यासोबतच, प्रभुदेवा सरांसोबत काम करणे हा एक जबरदस्त अनुभव होता. आम्ही या गाण्याच्या शूटिंगदरम्यान खूप मजामस्ती केले.”

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभु देवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan radhe movie new song release avb

Next Story
उसने पैसे वेळेत न दिल्यामुळे अंगावर अ‍ॅसिड टाकले
ताज्या बातम्या