सलमानने रिक्रिएट केला ‘मैने प्यार किया’मधील किसिंग सीन; पण नव्या ट्विस्टसह..

हा ट्विस्ट पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. 

SALMAN KHAN
सलमान खान

लॉकडाउनमुळे सामान्यांसह सेलिब्रिटीसुद्धा घरीच आहेत. अभिनेता सलमान खान त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसमध्ये राहत आहे. सोशल मीडियाद्वारे तो चाहत्यांच्या संपर्कात असून दररोज काही फोटो किंवा व्हिडीओ तो पोस्ट करत असतो. सलमानने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला असून सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत सलमानने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील किसिंग सीनला एक नवा ट्विस्ट दिला आहे. हा ट्विस्ट पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

सलमान खान व भाग्यश्री यांची मुख्य भूमिका असलेला ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील किसिंग सीनसुद्धा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. तोच लिपस्टिक सीन सलमानने रिक्रिएट केला आहे. जर तो चित्रपट आता प्रदर्शित झाला असता तर लिपस्टिक मार्कचा सीन कसा झाला असता, याचा मजेशीर व्हिडीओ सलमानने पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

या व्हिडीओत आधी चित्रपटातील मूळ सीन दाखवला जातो. त्यानंतर आताचा सीन दाखवताना सलमानच्या हातात अचानक सॅनिटाइजर येतं आणि त्याने तो काचेवरील लिपस्टिकचा मार्क पुसून टाकतो. या व्हिडीओवर वरुण धवन, रश्मी देसाई, नुशरत भरुचा, करिश्मा तन्ना यांनीसुद्धा कमेंट केली आहे.

करोना व्हायरसच्या प्रसारामुळे हँडवॉश, मास्क, सॅनिटाइजर या गोष्टींचं महत्त्व वाढलंय. त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीत खबरदारी घेण्याची गरज आहे. लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा चित्रपटांचं शूटिंग कसं होणार, याबाबतचा प्रश्न दिग्दर्शक शूजित सरकारनेही मांडला होता. शूटिंगसाठी अनेकजण मिळून काम करतात. अशा वेळी इतक्या जणांनी एकत्र येऊन कसं काम करणार, असा प्रश्न दिया मिर्झानेही उपस्थित केला होता. लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. त्याला चित्रपटसृष्टीही अपवाद नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan recreates lipstick scene of maine pyar kiya amid lockdown ssv

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या