वाढदिवशी सलमानला मिळाले मोठे गिफ्ट

हे गिफ्ट त्याला अर्पिता कडून मिळाले आहे

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आज म्हणजे २७ डिसेंबर रोजी ५४ वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करत असताना सलमानच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सलमानची बहिण अर्पित खानला कन्यारत्न झाला आहे. संपूर्ण खान कुटुंबीय नव्या पाहुणीच्या येण्याने आनंदात आहे.

अर्पिताला आज सकाळी ८च्या सुमारास रुग्णालयाता दाखल करण्यात आले होते. आता तिने मुलीला जन्म दिला असल्याचे समोर आले आहे. यावेळी अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात हजर होते.

 

View this post on Instagram

 

We’ve been blessed with a beautiful baby girl. Thank you so much for all the love and blessings for Ayat Sharma

A post shared by Aayush Sharma (@aaysharma) on

सलमानने अर्पिता गर्भवती असल्यामुळे त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्म हाऊसवर साजर करण्याऐवजी भाऊ सोहेल खानच्या मुंबईमधील वांद्रे येथील घरी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. कारण सलमनाने त्याचा वाढदिवस तिच्या मुलांसोबत साजरा करावा अशी अर्पिताची इच्छा होती. त्यामुळे सलमान कुठेही न जाता त्याचा वाढदिवस घरीच साजरा करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan recvied a big gift on his birthday given by arpita salman khan beacome mama avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या