बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सलमानचा आगळावेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या हे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे.

सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सलमान आणि आयुष दोघेही पाहायला मिळत आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोखून बघत असल्याने ही लढाई अंतिम असेल, असे यावरुन स्पष्ट दिसत आहे.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र

या चित्रपटाच्या पोस्टरवरुन दोन प्रमुख पुरुषांमधला एक महाकाय संघर्ष दिसत आहे. या चित्रपटाचे कथानक हे पोलीस आणि वेगवेगळ्या विचारधारांचे गँगस्टर यांच्या आसपास फिरत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर फक्त चित्रपटाचे नाव लिहिले असून ‘लवकरच’ असे लिहिले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट कधी रिलीज होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटींग सीनने होते. दरम्यान दोघेही शर्टलेस असल्याचे पाहायला मिळते. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.