बहीण अर्पिताने प्रियकर आयुषची कुटुंबाशी पहिली भेट घडवली तेव्हा सलमान म्हणाला, “आता मी…”

त्यावेळी तो जिममधला मुलगा, अर्पिता, माझे वडील आणि आई यांच्यासोबत उभा होता.” असेही सलमानने सांगितले.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि आयुष शर्माचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. नुकतंच एका मुलाखतीत सलमान खानने ‘अंतिम’ चित्रपटात काम करण्याबद्दल, तसेच आयुष शर्माच्या पहिल्या भेटीबद्दल अनेक खुलासे केले आहे.

या मुलाखतीत सलमानला आयुष शर्माबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. तुझा मेहुणा आयुष शर्मासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? सहकलाकार म्हणून त्याचा तुझ्यावर प्रभाव पडला का? असा प्रश्न एका पत्रकाराने त्याला विचारला. त्यावेळी तो म्हणाला, “मी जेव्हा एखाद्या चित्रपटाच्या सेटवर काम करत असतो, त्यावेळी तिथे बहीण, भाऊ, कुटुंब असे काहीही मानत नाही.”

“काही वर्षांपूर्वी आम्ही एक चित्रपट करत होतो. आमच्याकडे त्या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार होती. पण त्या भूमिकेसाठी माझे वय योग्य नव्हते. ‘माय पंजाबी निकाह’ असे या चित्रपटाचे नाव होते. यावेळी सोहेल माझ्याकडे आला आणि त्याने या भूमिकेसाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला शोधायचे ठरवले. यानंतर सोहेल मला म्हणाला की, मी गेल्या काही दिवसांपासून एका व्यक्तीला (आयुष शर्माला) जिममध्ये पाहिले आहे. तो या पात्रासाठी योग्य आहे, असे मला वाटते. त्यानंतर दोन दिवसांनी मी सोहेलला म्हणालो, ठिक आहे. तुला जर तो योग्य वाटत असले तर त्याल चित्रपटासाठी साईन करुया आणि पुढे सुरुवात करु.” असे सलमानने सांगितले.

हेही वाचा : ‘मेहनत करो भाई’, सलमानचा तरुण कलाकारांना सल्ला

“पण यानंतर सोहेल म्हणाला की तो हल्ली जिममध्ये येत नाही. तो यापूर्वी नियमित यायचा. पण आता मात्र तो येत नाही. पण त्यानंतर अचानक एक घटना घडली आणि तो आम्हाला सापडला. एकेदिवशी अर्पिताने आम्हाला फोन केला. मी तिच्या खालच्या मजल्यावर राहतो. तिने आम्हला सर्वांना बोलावून घेतले. तिच्या फोननंतर आम्ही सर्वजण तिला भेटायला गेलो. त्यावेळी तो जिममधला मुलगा, अर्पिता, माझे वडील आणि आई यांच्यासोबत उभा होता.” असेही सलमानने सांगितले.

“आम्ही त्याला आधी जिममध्ये पाहिले होते. त्यानंतर अर्पिता म्हणाली, ‘बाबा, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे.’ यावर मी तिला विचारले हा तोच जिममधील मुलगा आहे का? ज्याचा आम्ही शोध घेत आहोत. त्यावर ती म्हणाली हो. यानंतर मी परत एकदा सोहेलला विचारले की हा तोच माणूस आहे का? ज्याचा तो चित्रपटासाठी विचार करत होता? तर त्यानेही होकारार्थी मान डोलावली. त्यानतंर मी लगेचच म्हणालो, आता तर मी त्याच्यासोबत फ्रीमध्ये फिल्म बनवणार आहे,” असे सलमान म्हणाला.

हेही वाचा : “मुलींसारखा दिसतो”, लूकवरुन सलमानचा मेहुणा झाला होता ट्रोल

दरम्यान आयुष शर्माचा ‘लवयात्री’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात आयुष शर्मासोबत वारिना हुसैन झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. लवकरच आयुष हा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan reveals how sister arpita introduced aayush sharma to the family nrp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या