तो जे काही बोलतो, जे काही करतो त्याची बातमी बनते. पण, यावेळी बॉलीवूडचा दबंग खान सलमान कोणत्याही वादात अडकला नाहीए. तर, आपण सुरक्षित राहावे म्हणून आपल्यासाठी लढणा-या भारतीय लष्कर आणि शूर सैनिकांबद्दल प्रेम कसे व्यक्त करता येऊ शकते याबाबतचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. सर्वांच्या आयुष्यातील ख-या सुपरहिरोंना दिवाळीच्या शुभेच्छा देणारा छोटासा व्हिडिओ सलमानने फेसबुकवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने लिहलेय की, भारतीय लष्कर आणि देशातील सर्व नागरिकांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…. असे लिहत त्याने त्यास ‘संदेश टू सोल्जर[ (#Sandesh2Soldiers) असा हॅशटॅग दिला आहे.

या व्हिडिओत आपल्याला विविध नाती पाहायला मिळतात. दिवाळीपूर्वी पत्र लिहताना एक लहान मुलगा आपल्या वडिलांचा विचार करत असतो, एक मुलगा जवानाकडे पाहिल्यावर आपल्याला किती अभिमान वाटतो या भावना व्यक्त करतो, लष्करात असलेल्या आपल्या मुलाची वाट पाहणारी आई तो येणार नाही हे माहित असूनही त्याच्यासाठी लाडू बनवत असते , हे सदर व्हिडिओत पाहावयास मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एका संदेशाने व्हिडिओचा शेवट करण्यात आला आहे. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी अथक मेहनत घेणा-या जवानांना यंदाच्या दिवळीला सर्व देशवासियांनी #Sandesh2Soldiers या हॅशटॅगअंतर्गत शुभेच्छा पाठवाव्यात, असा संदेश त्यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ट्युबलाइट’ या आगामी चित्रपटात सलमान खान एका सैनिकाची भूमिका साकारत असल्याच्या सध्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वीच सैन्याच्या वेशात असलेल्या सलमानचा फोटो दिग्दर्शक कबीर खान याने सोशल मिडियावर शेअर केला होता. १९६२ साली झालेल्या युद्धावर आधारित असलेल्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाद्वारे कबीर आणि सलमान तिस-यांदा एकत्र काम करत आहेत. या दोघांनी ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटात चायनातील अभिनेत्री झु झु हिचीही भूमिका आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर ‘ट्युबलाइट’ प्रदर्शित होईल.