‘सुलतान’साठी सलमानचे चिमुकल्यांसोबत चित्रीकरण

चिमुकल्यांसोबत केलेली धम्माल सलमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या छायाचित्रातून दिसून येते.

छायाचित्रात सलमानभोवती शाळेच्या गणवेशातील चिमुकल्यांनी गर्दी केली

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या ‘सुलतान’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, नुकतेच त्याने या चित्रपटासाठी लहान मुलांसोबत चित्रीकरण केले. यावेळी चिमुकल्यांसोबत केलेली धम्माल सलमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या छायाचित्रातून दिसून येते. छायाचित्रात सलमानभोवती शाळेच्या गणवेशातील चिमुकल्यांनी गर्दी केली असून सलमानला या चिमुकल्यांनी पूर्ण वेढा घातला आहे. सुलतानच्या सेटवर आज या चिमुकल्यांसोबत चित्रीकरण केल्याचे सलमानने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
सुलतान हा सलमानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट यंदाच्या वर्षात ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून, चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman khan shoots with kids for sultan

ताज्या बातम्या