सलमान खानला राग अनावर; हिसकावून घेतला चाहत्याचा फोन

सलमान खानला राग येतो तेव्हा…

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान जितका दिलदार आहे तितकाच लहरी देखील आहे. अनेकदा तो गरजवंतांच्या मदतीचा अक्षरश: धावून जातो. तोच सलमान अनेकदा चाहत्यांशी धक्काबुक्की करायला देखील मागेपुढे पाहात नाही. सलमान खानचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये सलमान चाहत्याच्या हातातून फोन हिसकावून घेताना दिसत आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

सलमान खान या व्हिडीओमध्ये विमानतळावरुन बाहेर जाताना दिसत आहे. दरम्यान सलमानची एक झलक पाहाण्यासाठी चाहत्यांनी गर्दी जमा झाली आहे. त्या गर्दीतून वाट काढत, चाहत्यांना अक्षरश: धक्काबुक्की देत सलमानचे सुरक्षारक्षक त्याच्यासाठी वाट मोकळी करुन देत आहेत. दरम्यान एक चाहता सलमानचा फोटो काढण्यासाठी पुढे आला तेवढ्यात रागावलेल्या सलमानने त्याचा फोन हिसकावून घेतला. आणि निघून गेला. या सर्व प्रकार पाहून सर्व लोक अचंबित झाले.

सलमान खानच्या ‘दबंग -३’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला होता. काही प्रेक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली तर काही जणांनी खिल्ली देखील उडवली. परिणामी ‘दबंग ३’ मुळे झालेला अपेक्षाभंग दूर करण्यासाठी सलमान आता ‘राधे’ हा नवा अॅक्शनपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman khan snatches phone of a fan taking selfie with him mppg

ताज्या बातम्या