सलमान खानचे राष्ट्रप्रेम, नौदलाच्या जवानांसाठी पोळ्या करतानाचे फोटो व्हायरल

विशाखापट्टणममधील सलमान खानचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सलमान खानचे राष्ट्रप्रेम, नौदलाच्या जवानांसाठी पोळ्या करतानाचे फोटो व्हायरल
सलमान खान

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय असतो. तो अनेकदा सहभाग घेत लोकांना मदत करत असतो. सध्या तो विशाखापट्टणममध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. तसेच विशाखापट्टणममधील सलमान खानचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकण्यासाठी क्षिती सज्ज, लवकरच दिसणार ‘या’ चित्रपटात

नुकताच त्याने आपला दिवस नौदलाच्या जवानांसोबत घालवला. त्यांच्यासोबत त्याने गप्पा गोष्टी करत धमाल केली. त्यावेळी काढलेल्या फोटोमध्ये तो भारतीय नौदलाच्या जवानांबरोबर उभा असलेला दिसत आहे. त्याचे हे फोटो चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत.

नुकतंच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमान खानचे विशाखापट्टणम येथील जवानांच्या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यावेळी त्याने पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने भारतीय नौदलाची टोपीही घातली आहे. त्यासोबतच हातात राष्ट्रध्वज घेऊन सलमान खान जवानांसोबत छान वेळ घालवताना फोटोत दिसत आहे. या फोटोमध्ये नौदलाचे जवान आणि सलमान खान एकत्र नाचताना दिसत आहेत.

आणखी वाचा : सलमान खानही मराठी चित्रपटाच्या प्रेमात! अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ २’साठी लिहिली खास पोस्ट

तर दुसऱ्या एका फोटोमध्ये सलमान खान नौदलाच्या जवानांसाठी पोळी बनवताना दिसत आहे. सलमानचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यावर कमेंट्स करत सलमानचे आणि त्याच्या या कृतीचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“तो अंगठी विसरला अन्…” सोनालीने सांगितला कुणालच्या फसलेल्या प्रपोज प्लानचा किस्सा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी