बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान पहिल्यांदा दाक्षिणात्य स्टार चिरंजीवी यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. तेलुगू स्टार चिरंजीवी यांचा आगामी चित्रपट ‘गॉडफादर’मध्ये अभिनेता सलमान खानची खास भूमिका असणार आहे. ज्याच्या शूटिंगसाठी सध्या सलमान हैदराबादमध्ये आहे. पण सुरुवातीला सलमाननं या चित्रपटासाठी थेट नकार दिला होता. चित्रपटाच्या मेकर्ससोबत मानधनाच्या मुद्द्यावरून सलमानचा वाद झाला होता.

‘गॉडफादर’ चित्रपटाबाबतचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. चित्रपटाच्या मेकर्सना सलमान खाननं थेट चित्रपट सोडण्याची धमकी दिली होती. सलमानचा तापट स्वभाव तर सर्वांनाच माहीत आहे मात्र यावेळी असं करण्यामागचं कारण फारच वेगळं होतं. सलमानचं चिरंजीवींसोबत कोणतंही भांडण किंवा वाद नव्हता मात्र मेकर्सच्या वागण्यामुळे त्यानं हा चित्रपट सोडण्याची धमकी दिली होती.

Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Rashmi Shukla
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत काळजी घ्या; महासंचालकांचे आदेश

आणखी वाचा- कंगना रणौत अद्याप आहे अविवाहित; ‘ही’ व्यक्ती होऊ शकते आदर्श जीवनसाथी

रिपोर्टनुसार या चित्रपटात सलमान खान पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी सलमान खानला २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र सलमाननं मानधनाची रक्कम घेण्यास नकार दिला. सलमान खान आणि चिरंजीवी यांच्यात बऱ्याच वर्षांपासून खास मैत्री आहे. त्यामुळे त्याने हा चित्रपट कोणतही मानधन न घेता करण्याचा निर्णय घेतला होता.

आणखी वाचा- “या चित्रपटामुळे लोकांमध्ये तिरस्कार…” प्रकाश राज यांची ‘द कश्मीर फाइल्स’वर संतप्त प्रतिक्रिया

मात्र चित्रपटाच्या मेकर्सनी सलमानला मानधन घेण्याचा आग्रह केल्यानं सलमानचा पारा चढला. त्यानं मेकर्सना स्पष्ट शब्दात सांगितलं, ‘जर तुम्हाला मानधन द्यायचं असेल तर या भूमिकेसाठी दुसरा अभिनेता शोधा. कारण मी हा चित्रपट मानधन घेऊन करणार नाही.’ म्हणजेच सलमाननं मैत्रीचा मान राखत या चित्रपटातील भूमिका साकारली आहे.