‘बॉलिवूडचा भाईजान’ झळकणार ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर?

‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे.

फोटो – कलर्स टीव्ही (इन्स्टाग्राम)

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’चे ३ पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून स्पर्धकांमध्ये वाद, राडे प्रेक्षकांना सतत पाहायला मिळत आहे. दरम्यान ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हजेरी लावणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात सलमान खान हा ‘कलर्स मराठी’वरील ‘बिग बॉस’च्या शो मध्ये झळकणार आहे. यावेळी तो महेश मांजरेकरांसोबत स्पर्धकांना सल्ले देताना दिसणार असल्याचे बोललं जात आहे. सलमान खान ‘बिग बॉस’च्या शो मध्ये नेमका कधी येणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

येत्या काही दिवसात सलमान खान आणि आयुष शर्माचा ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान ‘बिग बॉस’मध्ये झळकणार असल्याचे बोललं जात आहे.

हेही वाचा : बहीण अर्पिताने प्रियकर आयुषची कुटुंबाशी पहिली भेट घडवली तेव्हा सलमान म्हणाला, “आता मी…”

दरम्यान नुकतंच ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वातील टॉप १० सदस्यांची घोषणा झाली आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरातून स्नेहा वाघ हिने एक्झिट घेतली. तर मीनल आणि गायत्री, तर जय आणि विकास मध्ये राडा झाला. घरामध्ये झालेल्या राड्यांवर महेश मांजरेकर यांनी सदस्यांची शाळा घेतली, कोण कुठे चुकते आहे हे सांगितले आणि सदस्यांची कानघडणी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan to make special appearance in bigg boss marathi 3 season nrp

ताज्या बातम्या