बॉलिवूड अभिनेता शक्ति कपूरने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. गोगो मास्टर ते नंदू पर्यंन्त शक्ति कपूरने त्यांच्या विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. गोविंदा, कादर खान अशा अनेक मोठ्या कलाकारांसोबत त्याने काम केले आहे. तसंच सलमान खान आणि त्याच्यात सुद्धा छान बॉंडिंग आहे. मात्र एक काळ असा होता की सलमान खान आणि शक्तीचे कपूरच पटत नव्हतं आणि तो बदला घेणार होता. शक्तिने एका मुलाखतीत घडलेला किस्सा शेअर केला आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला स्वत:च्या तालावर नाचवने अजून पर्यंन्त कोणालाच शक्य झाले नाही. परंतु हे काम शक्ति कपूरने केले आहे. हो शक्ति कपूरने सलमान खानला त्याच्या तालावर नाचवले होते. या किस्सा सांगताना शक्तिने एका मुलाखतीत गोष्टीचा खुलासा केला आहे. तो म्हणला, “सलमान लहान असताना माझे वडील, सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान अनेकदा बाल्कनीत बसून मद्द्पान करायचो आणि काही पेगनंतर मी सलमान, आरबाज आणि सोहेल खान या तिघांना बोलवून त्यांना डान्स करायला लावायचो. यावर सलमान मजेत म्हणायचा, “लहान असताना तू मला खूप त्रास दिला आहेस त्यामुळे आता मी तुमच्या मुलांना रस्त्यावर येऊन नाचायला लावेन.”

शक्ति पुढे म्हणाला की, “सलमान आणि माझ्या दोन्ही मुलं श्रद्धा, सिद्धान्त सोबत खूप छान बॉण्ड आहे. सलमान आजारी असताना मी त्याच्यासाठी प्रार्थना देखील केली होती. ” दरम्यान बिग बॉसच्या ५ व्या सिझनमध्ये शक्ति कपूर स्पर्धक म्हणून सहभाग झाला होता, या वादग्रस्त शो बद्दल त्याने एक वक्तव्य केले होते ज्यामुळे सलमान आणि त्याच्यात वाद सुरू झाले. मात्र, बाहेर आल्यानंतर त्यांचे संबंध पुन्हा सुधारले. या बाबत बोलताना त्याने सांगितले, “बिग बॉसच्या घरात रागात मी ही खूप काही बोलून गेलो, यामुळे त्याचे मन दुखावले आहे. मी सलमान खानचा खूप आदर करतो, माझे त्याच्या कुटुंबाशी खूप चांगले संबंध आहेत. सलमानने माझ्यासाठी खूप काही केले आहे.”