VIDEO: सेक्स की फूड?; समांथाने दिलेल्या उत्तराने उंचावल्या चाहत्यांच्या भुवया

समांथाचा हा जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने पती नागाचैतन्यला घटस्फोट दिला आहे. त्यानंतर आता समांथाचा एका जुन्या मुलाखतीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलाखतीमध्ये तिला सेक्स आणि फूड यांच्यामधील एक पर्याय निवडण्यास सांगण्यात आले होते. समांथाने दिलेल्या उत्तराने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२०१७ साली समांथाने दिलेल्या एका मुलाखतीमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती गप्पा मारताना दिसत आहे. दरम्यान, तिला सेक्स आणि फूड यांच्यामधील एक पर्याय निवडण्यास सांगण्यात आला होता. त्यावर उत्तर देत समांथा म्हणाली, ‘मी यातला एक पर्याय निवडू शकत नाही.’ त्यानंतर ती थोडं थांबते आणि म्हणते, ‘सेक्स.. मी एक दिवस उपवास करु शकते.’ समांथाने दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Video: पुरस्कार सोहळ्यात कॅमेरासमोर बोलताना अभिनेत्रीचा ड्रेस खांद्यावरुन घसरला अन्…

समांथा लवकरच तेलुगू चित्रपट शकुंतलम आणि तमिळ चित्रपट काठू वकालु रेंदु कधालमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात समांथा रुथ प्रभू सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. तसेच ती राज एण्ड डीके यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. एका वेब सीरिजचे समांथा चित्रीकरण सुरु करणार असल्याचे म्हटले जाते.

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली. २०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चैतन्य आणि समांथा पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samantha asked to choose between sex and food in old video viral avb

Next Story
करण जोहरचा मुलगा बनला शेफ! व्हिडीओ व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी