“तुम्ही आता जे आहात त्यासाठी कृतज्ञ रहा”, नागा चैतन्यासोबतच्या घटस्फोटानंतर समांथाची पोस्ट

नुकतीच समांथाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टला तिने #MYMOMMASAID हे हॅशटॅग दिलंय.

samantha-ruth-prabhu (1)

नागा चैतन्यसोबत घटस्फोट जाहीर केल्यानंतर अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा स्वत:वर लक्ष केंद्रीत करत आहे. समांथा या सर्व तणावातून बाहेर येण्यासाठी मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवताना दिसतेय. कधी निसर्गाच्या सानिध्यात तर कधी मंदिरांना ती भेट देताना दिसतेय. समांथा तिच्या इन्स्टाग्रामवर आणि इन्स्टास्टोरीला विविध फोटो आणि पोस्ट शेअर करत आहे.

सामंथा नुकतीच चार धाम यात्रेवरून परतली आहे. समांथाने तिची मैत्रिण शिल्पा रेड्डीसोबत गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथला भेट दिली. या ट्रीपचे अनेक फोटो समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिच्या पोस्टमधून तिने बेस्टफ्रेण्ड शिल्पाचे आभार मानले आहेत. तसचं ही ट्रीप सुंदर असल्याचं ती म्हणाली. नुकतीच समांथाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टला तिने #MYMOMMASAID हे हॅशटॅग दिलंय. ज्यात ‘माझी आई म्हणते’ असं लिहिण्यात आलंय. तर पोस्टमध्ये ती म्हणाली, “तुम्ही आता जे आहात त्यासाठी कृतज्ञ रहा, आणि तुम्हाला उद्या काय व्हायचंय त्यासाठी लढा सुरू ठेवा”

जिनिलियाच्या कानशिलात लगावणाऱ्या अभिनेत्याला रितेश देशमुखने चोपलं, ‘असा’ घेतला बदला


समांथाने तिच्या ट्रीपच्या शेवटचा दिवसाचा फोटो शेअर करत तिचा अनुभव सांगितला होता. “एका अप्रतिम ट्रीपचा शेवट…हिमालयाचं नेहमीच मला आकर्षण होतं. जेव्हापासून मी महाभारत वाचलंय तेव्हापासूनच पृथ्वीवरील या नंदनवनाला भेट देण्याचं स्वप्न पाहिलंय….एक महान गूढ ठिकाण.. देवांचे निवासस्थान” असं म्हणत समांथाना हिमालय पर्वत रांगांमधील या विविध ठिकाणांना भेट दिल्याचा आनंद व्यक्त केलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samantha ruth parabhu inspirational post after divorce with naga chaitanya kpw

Next Story
Video : ‘माझा होशील ना’ मालिकेतील ‘आदित्य’चे नवे टॅलेंट पाहिलेत का?
फोटो गॅलरी