Samantha Ruth Prabhu fans trolled Sobhita Dhulipala-Naga Chaitanya : तेलुगू अभिनेता नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. समांथा रुथ प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर तीन वर्षांनी त्याने अभिनेत्री सोभिता धुलीपालाशी साखरपुडा केला आहे. ८ ऑगस्ट रोजी दोघांचा साखरपुडा हैदराबादमधील घरी पार पडला. दिग्गज अभिनेते व नागा चैतन्यचे वडील नागार्जुन अक्कीनेनी यांनी या दोघांच्या साखपुड्याचे फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर आता सोभिताने साखरपुड्यातील काही सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. सोभिताने नागा चैतन्यबरोबर हे फोटो शेअर केले आहेत. यात दोघेही पारंपरिक पोशाखात सुंदर दिसत आहेत. तसेच दोघांनी फोटोसाठी कँडिड पोजही दिल्या आहेत. हे फोटो शेअर करत सोभिताने एक के रामानुजन यांनी भाषांतर केलेल्या कुरुंथोगाई कवितेतील ओळी लिहिल्या. "What could my mother beto yours?What kin is my fatherto yours anyway?And how did you and I meet ever?But in love our heartsare as red earth and pouring rain:mingled beyond parting. –From Kurunthogai, translated by A K Ramanujan" असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं. सोभिताने साखरपुड्यातील फोटो शेअर केल्यावर तिला व नागा चैतन्यला चाहते व सिनेसृष्टीतील मंडळी कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत. अनुराग कश्यप, दिया मिर्झा, मलायका अरोरा, दिव्येंदू शर्मा यांनी दोघांचं अभिनंदन केलं आहे. दुसरीकडे चाहते मात्र समांथाचा उल्लेख करत आहेत. अभिनेत्री सोभिता धुलीपाला-नागा चैतन्यच्या साखरपुड्याचे Unseen Photos पाहिलेत का? 'समांथा बेस्ट आहे,' 'सोन्याच्या शोधात त्याने हिरा गमावला,' 'समांथा हिरा आहे,' 'कोणी सगळं विसरून इतक्या लवकर आयुष्यात पुढे कसं जाऊ शकतं,' 'आम्ही समांथाला सपोर्ट करतोय,' 'ही तुम्हाला समांथापेक्षा चांगली वाटतेय?' अशा प्रकारच्या कमेंट्स यावर केल्या आहेत. सोभिताच्या फोटोवर समांथा रुथ प्रभूच्या चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya Divorce: दरम्यान, नागा चैतन्यचं पहिलं लग्न अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी झालं होतं. २०१७ मध्ये त्यांना शाही सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती, पण लग्नानंतर ते चार वर्षातच वेगळे झाले. २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नागा चैतन्य व सोभिता धुलीपाला यांची भेट झाली. सोभिता व चैतन्य एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखतात, असं नागार्जुन अक्कीनेनी यांनी सांगितलं. नागा चैतन्यची होणारी पत्नी सोभिता धुलीपालाबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का? विकी कौशलच्या सिनेमातून केलेलं पदार्पण नागा चैतन्य व सोभिता धुलीपाला यांच्या डेटिंगच्या चर्चा जवळपास दोन वर्षांपासून होत्या. दोघेही अनेकदा फिरायला व डेटवर गेल्यावर चाहते त्यांचे फोटो काढायचे व ते सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. पण या दोघांनी कधीही नात्याची कबुली दिली नव्हती. त्यांनी ८ ऑगस्ट रोजी थेट साखरपुडा करून आनंदाची बातमी दिली. त्यांच्या साखरपुड्याची बातमी नागार्जुन अक्कीनेनी यांनी फोटो शेअर करून दिली होती.