नागाचैतन्यला विसरण्यासाठी समांथाने उचलले ‘हे’ पाऊल?

जाणून घ्या समांथाने नेमकं काय केलं आहे.

Samantha Ruth Prabhu, Samantha Akkineni, Naga Chaitanya, Samantha Ruth Prabhu in news, SamanthaRuth Prabhu latest news,

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अभिनेत्री समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी वेगळं होत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. आता समांथाने नागाचैतन्यला विसरण्यासाठी मोठे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.

समांथाने नागाचैतन्यला विसरण्यासाठी पुन्हा चित्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तिने नवा चित्रपट साईन केल्याचे म्हटले आहे. हा एक बॉलिवूड चित्रपट असून लवकरच निर्माते या चित्रपटाची घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण नागाचैतन्यला विसरण्यासाठी समांथाने चित्रीकरणास सुरुवात केली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर नागाचैतन्यची पहिली पोस्ट, म्हणाला…

समांथा लवकरच तेलुगू चित्रपट शकुंतलम आणि तमिळ चित्रपट काठू वकालु रेंदु कधालमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच समांथा रुथ प्रभू सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. तसेच ती राज एण्ड डीके यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. एका वेब सीरिजचे समांथा चित्रीकरण सुरु करणार असल्याचे म्हटले जाते.

२००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samantha ruth prabhu gets first bollywood movie post announcing divorce avb

ताज्या बातम्या