Samantha Ruth Prabhu Post For Akhil Akkineni: दाक्षिणात्य स्टार नागार्जुन यांचा मुलगा अभिनेता अखिल अक्किनेनीचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘लेनिन’ आज सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला आहे. त्याच्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. अशातच अखिलसाठी एका खास व्यक्तीने पोस्ट केली आहे. अखिलचा सावत्र भाऊ नागा चैतन्यची एक्स पत्नी समांथा रुथ प्रभू हिने सोशल मीडियावर या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
समांथा रुथ प्रभू हिने केलेल्या या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे. घटस्फोटानंतर अक्किनेनी कुटुंबाबद्दल बोलणंही टाळणाऱ्या समांथाने अखिलसाठी केलेल्या खास पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.
समांथाने अखिल अक्किनेनीसाठी केली पोस्ट
समांथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘लेनिन’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिलं, “लेनिनसाठी अखिल अक्किनेनी आणि संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल असे संकेत मिळत आहेत.”

नागा चैतन्यची भावासाठी खास पोस्ट
नागा चैतन्यने देखील आपला भाऊ अखिल अक्किनेनीसाठी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “तुझ्या कष्टाचं चीज झालंय. लोकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि तुझं कौतुक होताना पाहून खूप आनंद होत आहे. खासकरून तुझा अभिनय खूपच अप्रतिम आहे. ‘लेनिन’च्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन.”
सध्या ‘लेनिन’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘स्क्रीन’ने केलेल्या रिव्ह्यूनुसार, “‘लेनिन’ चित्रपटाचं सर्वात मोठं यश म्हणजे अखिल अक्किनेनी होय. त्याने दमदार अभिनय केला आहे. त्याचा अभिनय खूपच प्रभावी आहे. त्याच्या करिअरमधील हे आतापर्यंतचे सर्वात उत्कृष्ट काम आहे. त्याने ‘लेनिन’ ही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारली आहेत. खासकरून चित्रपटाच्या उत्तरार्धात त्याचा अभिनय खूपच प्रभावी आहे.”
नागा चैतन्य व समांथा रुथ प्रभू यांचं नातं
नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू यांनी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. ४ वर्षांच्या संसारानंतर २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर काही वर्षांनी दोघेही आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. समांथाने चित्रपट दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केलं, तर नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्याशी लग्नगाठ बांधली. समांथा रूथ प्रभू लवकरच राजबरोबर आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे
