“गरज भासल्यास एखाद्याच्या कानशिलातही लगावू शकेल इतकं…”, समांथाची पोस्ट चर्चेत

समांथाने शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

samantha, samantha ruth prbhu,
समांथाने शेअर केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी समांथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट झाला. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत समांथा पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतीच एक पोस्ट शेअर करत समांथाने पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट समांथाने स्टोरीच्या माध्यमात शेअर केली आहे. ‘तुमच्या मुलीला अशा पद्धतीने घडवा, की तिच्याशी लग्न कोण करणार याची चिंता तुम्हाला करावी लागणार नाही. तिच्या लग्नासाठी पैसे जमवण्यापेक्षा, तिच्या शिक्षणासाठी खर्च करा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या दृष्टीने तिला शिकवण देण्यापेक्षा स्वत:च्या अस्तित्वाबद्दल तिला शिकवा. तिला स्वत:वर प्रेम करायला शिकवा, आत्मविश्वासाने वावरणं शिकवा आणि गरज भासल्यास ती एखाद्याच्या कानशिलातही लगावू शकेल, इतकं सक्षम तिला बनवा’, अशी पोस्ट समंथाने शेअर केली आहे.

आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ

आणखी वाचा : Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

घटस्फोटानंतर समांथा तिच्या मैत्रिणीसोबत चार धाम यात्रेला गेली होती. या यात्रेचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नुकतंच तिने पेंटिंग करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samantha ruth prabhu shares posts for parents saving up for daughter s marriage dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या