scorecardresearch

“मी संसार टिकवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न केले, पण…” समांथा रुथ प्रभूचं वक्तव्य, म्हणाली “नागाचैत्यनबरोबर घटस्फोट घेण्याचा…”

नागाचैतन्यबरोबर घटस्फोटाबाबत समांथा रुथ प्रभूचं वक्तव्य

samantha ruth prabhu on naga chaitanya
समांथा रुख प्रभू. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

समांथा रुथ प्रभू व नागाचैतन्य हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल होते. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. नागाचैतन्य व समांथाने २०१७ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु, अवघ्या चारच वर्षात त्यांचा सुखाचा संसार मोडला. २०२१मध्ये घटस्फोट घेत नागाचैतन्य व समांथा वेगळे झाले.

समांथाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिअर, वैयक्तिक आयुष्य व नागाचैतन्यबरोबरच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं. समांथा म्हणाली, “नागाचैतन्यपासून वेगळं होण्याचा मला पश्चाताप नाही. मी काही चुकीचं केलं नाही. मी माझा संसार टिकवण्यासाठी १०० टक्के दिले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. यामुळे मला स्वत:चं नुकसान करून घ्यायचं नव्हतं. मी ज्या गोष्टी केलेल्या नाहीत त्यासाठी मी स्वत: ला दोषी समजत होते”.

हेही वाचा>> आत्महत्येच्या तीन दिवसांनी आकांक्षा दुबेचा शवविच्छेदन अहवाल समोर, बॉयफ्रेंड समर सिंहवर अटकेची टांगती तलवार

नागाचैतन्यबरोबर घटस्फोटाच्या दरम्यानच पुष्पा चित्रपटातील ऊ अंटावा या आयटम साँगची ऑफर समांथाला आली होती. याबाबतही अभिनेत्रीने भाष्य केलं. “ऊ अंटावा आयटम साँग असल्यामुळे माझे कुटुंबीय व मित्रमैत्रीणींकडून यासाठी नकार होता. ज्यांनी मला आयुष्यभर प्रोत्साहित केलं त्यांनाच मी हे गाणं करू नये असं वाटत होतं. पण मला हे करायचं होतं. त्यावेळी माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. यादरम्यान मला घरी बसायचं नव्हतं. म्हणून मी या गाण्याची ऑफर स्वीकारली”, असंही समांथा पुढे म्हणाली.

हेही वाचा>> करीना कपूरचं उर्फी जावेदबाबत वक्तव्य, कौतुक करत म्हणाली “ती खूप हुशार आणि…”

दरम्यान, समांथा रुख प्रभू तिच्या आगामी ‘शंकुतलम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून समांथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 12:30 IST

संबंधित बातम्या