“अशा वेड्या स्पर्धकांसोबत खेळू नका”, समांथाने शेअर केला रस्सीखेच खेळतानाचा धमाल व्हिडीओ

यात शेवटी समांथा आणि जमिनीवर पडून लोटपोट हसताना दिसत आहे.

samantha-prabhu

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवत असल्याचं दिसत आहे. नुकताच समांथाने एक धमाल व्हिडीओ शेअर केलाय. समांथाची मैत्रीण आणि फॅशन डिझायनर-मॉडेल शिल्पा रेड्डीने शेअर केलेला व्हिडीओ समांथाने रीपोस्ट केला आहे. या व्हिडीओत समांथा आणि तिच्या मित्र मैत्रिणी रस्सीखेच खेळताना दिसत आहेत.

समांथाने शेअर केलेल्या व्हिडीओत दोन्ही बाजूला दोनजण मिळून रस्सीखेच खेळताना दिसत आहेत. यात शेवटी समांथा आणि जमिनीवर पडून लोटपोट हसताना दिसत आहे. तर हा खेळ सर्वच खूप एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ शेअर करत समांथाने एक मेजेशीर कॅप्शन दिलंय. “तंदूरुस्त आणि वेड्या स्पर्धकांसोबत कधीही अशा ग्रुपमधले खेळांमध्ये सहभागी होवू नका… तुम्हाला दुखापत होवून वेदना होवू शकतात.” अशी सुचना तिने दिली आहे.

KBC 13: “कॉलेजचे ते दिवस आठवले”; अमिताभ बच्चन यांनी क्रिती सेनॉनसोबत केला खास डान्स


तर शिल्पा रेड्डीने सामंथासोबतच्या गेटटुगेदरचे काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेता नागा चैतन्यसोबत विभक्त होत असल्याचं समांथाने या महिन्याच्या सुरुवातीलाच जाहीर केलं होतं. त्यानंतर समांथा पुन्हा एकदा कामावर लक्ष केंद्रीत करू लागली आहे.तसचं मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samantha ruth prabu reposted funny video playing tug of war goes viral kpw

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या