Samay Raina roasts Amitabh Bachchan over Abhishek Bachchan’s career and KBC experience : कॉमेडियन समय रैना काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमामुळे प्रचंड चर्चेत होता. त्याच्याबरोबर इतरही काही लोकप्रिय सोशल मीडिया क्रिएटर त्यावेळी उपस्थित होते. त्यापैकीच एक म्हणजे यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया. ज्याच्या एका वक्तव्याने त्यावेळी प्रचंड गदारोळ झाला होता. त्यानंतर समय रैनाविरोधात याचिका दाखल झालेली. अशातच आता समयने अनेक दिवसांनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
अशातच आता समयने अनेक दिवसांनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. समयने या नवीन व्हिडीओमध्ये बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना रोस्ट केले आहे. त्याने अमिताभ यांच्या पोलिओ जाहिरातींचा संदर्भ देत अभिषेक बच्चनच्या करिअरवर खोचक टीका केली आहे. अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चनबद्दल तो नेमकं काय म्हणाला सविस्तर जाणून घेऊयात…
समय रैना त्याच्या या व्हिडीओमध्ये म्हणाला, “मी इंटरनेटवर कधीच चांगला आहे असा आव आणत नाही. मी खऱ्या आयुष्यात जसा आहे त्याहीपेक्षा अधिक वाईट इंटरनेटवर आहे. त्यामुळे मी काही चांगलं काम केलं तर लोक प्रश्न विचारणार नाही पण, जर एक चांगली प्रतिमा असलेल्या व्यक्तीने चुकून काही चुकिचं केलं तर लोक त्याच्यावर टीका करतील”. असं म्हटलं आहे. याचंच उदाहरण देत तो पुढे म्हणाला, “मी केबीसीमध्ये गेलो होतो. तेव्हा सभ्य वागण्याचा प्रयत्न केला. पण, माझ्या डोक्यात तेव्हासुद्धा उल्टे-सुल्टे विचार आलेच होते ना”.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल समय रैनाचं वक्तव्य
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल समय म्हणाला, “सर तुम्ही इतक्या पोलिओच्या जाहिराती केल्या आहेत. तरीसुद्धा तुमच्या मुलाला त्याच्या पायावर का उभं करू शकला नाही? पण, मी नाहीना बोलून दाखवलं. तिथे मी काय बोललो की सर माझी आजी तुमची खूप मोठी चाहती आहे. खरंतर माझ्या आजीचं निधन होऊन ७ वर्षे झाली आहेत. पण, तुम्हाला असा आव आणावा लागतो. भारतात इंटरनेटवर तुम्ही खरं वागू शकत नाही. हाच खरा खेळ आहे आणि मला तो कळतो.”
केबीसीबद्दल समय पुढे म्हणाला, “केबीसीमध्ये जाताना मी हा विचार केला की तिथे मी खूप सभ्य वागणार म्हणजे लोकांना वाटेल की मी खूप बहुगुणी क्रिएटर आहे जो सभ्यही वागू शकतो आणि असभ्यसुद्धा वागू शकतो. बिअर बायसेपनेही(रणवीर अलाहबादिया) हाच विचार केला असेल की मी प्रत्येक ठिकाणी सभ्य राहतो मग इथे थोडा वेगळा वागतो. त्याचं ते कृत्य मला खूप महागात पडलं. मला माझा शो बंद करावा लागला. देशातील ४ कोटी लोक माझा शो पाहत होते. मी युएसमध्ये होतो. जेव्हा मला मुंबई पोलिसांचा फोन आला आणि ते म्हणाले तुम्हाला सर्व एपिसोड डिलीट करावे लागतील. मी म्हटलं मी करणार नाही. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मग त्यांनी माझ्या एडिटरला अटक केली. त्याने मला सांगितलं की पोलिस स्टेशनमध्ये २० पोलिस अधिकारी होते आणि ते सगळे एपिसोड बघत होते आणि यापूर्वी अशी भाषा कधी वापरण्यात आलीये का त्याचा तपास करत आहेत. मग मी ठरवलं की पोलिसांनी राखी सावंतचा एपिसोड पाहण्याआधी मीच सगळे व्हिडीओ डिलीट करतो. राखी सावंतचा एपिसोड जर पोलिसांनी पाहिला असता तर त्यांनी मला देशातून काढून टाकलं असतं.”
Samay Raina roasting amitabh bachchan, don't miss 0:21 sec ?? pic.twitter.com/f9RUXp1mr3
— Aditya. (@Adityaverce) April 7, 2026
रेखा यांचा उल्लेख करत अमिताभ बच्चन यांना केलं रोस्ट
अमिताभ बच्चन यांना रेखा यांचं नाव घेऊन रोस्ट करत समय पुढे म्हणाला, “अमिताभ बच्चन यांनी तो व्हिडीओ पाहिला तर असेल. ते ट्वीटरवर खूप सक्रिय असतात. त्यांनी मला पहिल्यांदा जेव्हा टीव्हीवर पाहिलं असेल तेव्हा त्यांना वाटलं असेल की मी खूप मोठं काम केलं असेल, परमवीर चक्र मला मिळालं असेल. त्यांनी सगळ्यांना बोलावलं असेल, अभिषेक, रेखा.., जया, ऐश्वर्या या सगळ्यांनी बोलावलं असेल आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर रक्ताच्या उलट्या केल्या असतील. सूर्यवंशमसारखं झालं असेल त्यांच्याबरोबर. ती रात्र खूप वाईट होती. सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवलेली.
