वडिलांना गमावल्यानंतर संभावना अडचणीत?; शेअर केला आजारी आईचा व्हिडीओ

तिन महिन्यांपूर्वी संभावनाच्या वडिलांचे निधन झाले आहे.

वडिलांना गमावल्यानंतर संभावना अडचणीत?; शेअर केला आजारी आईचा व्हिडीओ
वडिलांच्या निधनाच्या तिन महिन्यांतर संभावनची आई आजरी असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संभावना सेठ सध्या कठीण काळातून जात आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाले. आता वडिलांच्या निधनाच्या तिन महिन्यांतर संभावनाची आई आजरी असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.

संभावनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची आई अंथरुणात असल्याचे दिसत आहे. ‘मित्रांनो मी तुमच्यासोबत हा व्हिडीओ शेअर करत आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहे. पहिले मी माझ्या वडिलांना गमावले आणि आता माझ्या आईला या आवस्थेत पाहून मी आतून तुटले आहे’ या आशयाचे तिने कॅप्शन दिले आहे.

संभावनाच्या या पोस्टवर इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. दिग्दर्शक महेश पाडेने ‘देवाचा आशिर्वाद आहे, विश्वास ठेव’ असे म्हटले आहे. रश्मी देसाई, भारती सिंह, पंखुडी अवस्थी, डेलनाज ईराणी आणि इतर काही कलाकारांनी संभावनाच्या आईसाठी प्रार्थना केली आहे.

यापूर्वी संभावनाने वडिलांच्या मृत्यूला हॉस्पिटल जबाबदार असल्याचे म्हटले होते. “त्यांनी माझ्या वडिलांना मारले. ज्या प्रकारे लोक बोलतात की हे जग ब्लॅक अॅंड व्हाईट नसतं. त्याचप्रमाणे, प्रत्येक डॉक्टर ईश्वर समान असू शकत नाही. असेही काही वाईट लोक आहेत ज्यांनी पांढरा कोट घातला आहे आणि त्यांनी आपल्या प्रियजनांचा जीव घेतला आहे,” असे संभावना सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हणाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sambhavna seth mother fell ill shared an emotional video avb

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या