संजय जाधवच्या दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू ही रे या सिनेमांनी प्रेक्षकांना अगदी भावूक केलं. या तिन्ही सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला एका वेगळ्याच दुनियेच दर्शन घडवून आणलं. संजय जाधवचा सिनेमा म्हटला की काही तरी वेगळं मिळणारच हे आत्ता प्रेक्षकांनी गृहितच धरल आहे. त्याचा आगामी सिनेमा गुरु हा भावनिक जगाकडून वास्तवतेकडे नेणारा असा आहे. अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर या दोघांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात असणार आहेत. गुरु ठाकूरच्या शब्दांची तर अमितराज आणि पंकज पडघन यांच्या सुरेल संगीताची जादू आपल्याला याही सिनेमात ऐकायला मिळणार आहे. सिनेमाच्या कथेबाबत सध्या तरी गुप्तता पाळण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘गुरु’ सिनेमाच्या नावावरूनचं त्याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2015 रोजी प्रकाशित
बॉलीवूडनंतर आता मराठीत ‘गुरु’
अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर या दोघांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात असणार आहेत.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 07-11-2015 at 14:40 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samjay jadhavs next marathi movie guru