राजकारणातले डावपेच, आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडणं, वेळोवेळी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देणं हे सगळं करताना तुम्ही पक्षाच्या प्रवक्त्यांना पाहिलं असेलच. पक्षावर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तरं देणं, प्रचारादरम्यान मतदारांना पक्षाविषयी माहिती देणं अशी कामं करणारे, राजकारणात मुरलेले नेते जर स्टॅण्डअप कॉमेडी करू लागले तर? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी हा प्रयोग करून पाहिला आहे. आपले राजकारणातले अनुभव विनोदप्रेमी प्रेक्षकांसाठी मांडतानाचा त्याचा हा व्हिडीओ पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप देशपांडे हे नेहमीच विरोधकांना हे विरोधकांवर केलेल्या टीकेमुळे सतत बातम्यांचा विषय ठरतात. त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत त्यांच मत मांडताना दिसतात. आता ते थेट स्टॅण्डअप कॉमेडीच्या मैदानात उतरले आहेत. झी मराठीचा नवा कार्यक्रम ‘हे तर काहीच नाय!’ यात त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या सेन्स ऑफ ह्युमर बद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

आणखी वाचा : ‘पुष्पा’मुळे लागला जॅकपॉट; समांथाला मिळाली बॉलिवूडमधल्या ३ चित्रपटांची ऑफर

यावेळी त्यांनी एका दौऱ्याचा किस्सा सांगितला आणि नंतर म्हणाले की राज साहेबांच्या ह्युमर बद्दल नाही सांगितले तर काय मज्जा ना असं म्हणतं त्यांनी एक किस्सा सांगितला. निलेश साबळे हे राज साहेबांना भेटायला गेले होते. तर राज साहेबांच्या नवीन घरी दोन छोटे हत्ती ठेवले होते. त्यावेळा राज साहेब म्हणाले, हे दोन छोटे हत्ती इथे आहेत आणि त्या दरवाज्यात पाहिलसं का तू? तिथे दोन मोठे हत्ती ठेवले आहेत. पुढे ते म्हणाले की आताच एका कार्यकर्त्याचा फोन आला होता आणि तो म्हणाला साहेब नवीन घरासाठी एक हत्ती पाठवतो. तर मी त्याला म्हणालो हत्ती खूप झाले आहेत आता माहूत पाठव. संदीप यांनी सांगितलेल्या या किस्स्यावर उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागले. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandip deshpande talkes about mns leader raj thackeray s sense of humore in he tar kahich naahi marathi show dcp
First published on: 19-01-2022 at 10:57 IST