संगीता बिजलानी ‘अझर’च्या निर्मात्यांना न्यायालयात खेचणार?

चित्रपटात आपल्याला घरभेदी दर्शविल्याची भीती संगीता बिजलानीला सतावत आहे.

इमरान हाश्मी, प्राची देसाई आणि नर्गिस फाखरीच्या अभिनयाने सजलेला माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारीत ‘अझर’ हा चित्रपट वादांच्या गर्ततेत फसण्याची चिन्हे दिसत आहेत. संगीता बिजलानी ‘अझर’च्या निर्मात्याला न्यायालयात खेचणार असल्याचा दावा माध्यामांतील वृत्तातून करण्यात आला आहे. ‘बॉलिवूड लाइफ डॉट कॉम’मधील वृत्तानुसार चित्रपटात आपल्याला घरभेदी दर्शविल्याची भीती संगीता बिजलानीला सतावत आहे. या विषयावर संगीताने अझरुद्दीनशी फोनवर संवाद साधल्याचे वृत्तदेखील आहे. संगीताने प्रदर्शनापूर्वी चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजते. घटस्फोट झाल्यापासून अझरुद्दीन आणि संगीता एकमेकांशी संवाद साधत नव्हते. पाच वर्षांनंतर संगीताने अझरला फोन केला असून, आठ वर्षांपूर्वी दोघे एकमेकांपासून वेगळे झाले होते. चित्रपटात नर्गिस फाखरी संगीता बिजलानीची व्यक्तिरेखा साकारत आहे. इमरान हाश्मी अझरची व्यक्तिरेखा साकारत असून, एकता कपूर चित्रपटाची निर्मिती करत आहे. १३ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्राची देसाई अझरुद्दीची पत्नी नौरीनची व्यक्तिरेखा साकारत आहे. सूरतमधील एका स्पोर्टस् कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या ज्वाला गट्टाला माध्यमांशी संवाद साधताना अझरुद्दीनबरोबरच्या तिच्या अफेअरबाबत प्रश्न विचारला असता ती चांगलीच संतापली. ही अफवा असून, तुम्ही परत-परत असे प्रश्न का विचारता. अनेक वेळा उत्तर देऊन देखील हा प्रश्न माझा पिच्छा सोडत नसल्याचे ज्वाला म्हणाली.

azhar-2 azhar-1 azhar-3

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sangeeta bijlani is all set to sue makers of emraan hashmis azhar calls up azharuddin after 5 years

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन