गेल्या तीन महिन्यांपासून पॅरोलवर तुरुंगाबाहेर असलेल्या अभिनेता संजय दत्तला आज (२१ मार्च) येरवडा तुरुंगात परतावे लागणार आहे. २१ डिसेंबर २०१३ पासून संजय दत्त पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. पत्नी मान्यता दत्तच्या आजारपणामुळे तिची देखभाल करण्यासाठी संजयने सुटीचा अर्ज टाकला होता.
२१ डिसेंबर २०१३ला संजयने पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे एक महिन्यासाठी पॅरोलचा अर्ज केला होता. २१ डिसेंबरपर्यंत त्याला सुटी मंजूर झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा पॅरोलचा अर्ज केला. २१ जानेवारीपर्यंत त्याला मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर त्याची पॅरोलची मुदत २१ फेब्रुवारी आणि पुढे २१मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती.  
संजय दत्तला १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापैकी ४२ महिन्यांची शिक्षा संजयने पूर्ण केली आहे. उर्वरीत साडे तीन वर्षांची शिक्षा त्याला भोगायची आहे. या बॉम्बस्फोटात २५०जण मृत्युमुखी पडले होते तर, काहीजण जखमी झाले होते.