‘किसी की मुस्कुराहटों पे..’ गाण्यात बीग बींसोबत झळकणार संजय दत्तचा मुलगा

‘किसी की मुस्कुराहटों पे..’ गाण्याचे रिमिक्स करण्यात आले

संजय दत्त आणि त्याचा मुलगा शाहरान.

संजय दत्तचा लहान मुलगा शाहरान लवकरचं बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. संजयच्या होम प्रॉडक्शन अंतर्गत ‘हसमुख पिघल गया’ हा चित्रपट बनत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात राज कपूर यांच्या प्रसिद्ध ‘किसी की मुस्कुराहटों पे..’ गाण्याचे रिमिक्स करण्यात आले आहे. त्यात शाहरान एक छोटीशी भूमिका वटवणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
चित्रपटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी किसी की मुस्कुराहटों पे.. गाण्याचे अधिकार विकत घेण्यात आले आहेत. केवळ तीन वर्षांचा असलेला शाहरान किसी की मुस्कुराहटों पे.. रिमिक्स गाण्यात दिसणार असून हे गाणे चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी दाखविण्यात येईल. सुरुवातीच्या गाण्यात चित्रपटातील मुख्य कलाकार अरमान दिसणार असून शेवटी दाखविण्यात येणा-या गाण्यात अमिताभ बच्चन पाहावयास मिळतील.
नेजल शाह दिग्दर्शित या चित्रपटात संजयची भाची नाझिया हुसैन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक ओ पी रालहान यांचा नातू अरमान हे मुख्य भूमिकेत दिसतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay dutts son to appear in remix of raj kapoors song

ताज्या बातम्या