‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमातून आलियाचा इंटिमेट सीन हटवणार; ‘यासाठी’ संजय लीला भन्साळींनी घेतला निर्णय

आलिया भट्टने ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय

gangubai-kathiawadi
(File Photo)

संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाई यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान या सिनेमासंबंधित एक नवं वृत्त समोर आलंय. या सिनेमात गंगूबाई आणि त्यांचा प्रियकर यांच्यात एक इंटिमेट सीन होता. मात्र या सिनेमात आता आलिया भट्ट आणि तिचा ऑनस्क्रीन प्रियकर शांतनु माहेश्वरी यांच्यामधील हा इंटिमेट सीन दिग्दर्शक संजय लीला भन्साळी काढून टाकणार असल्याचं वृत्त आहे.

करोना माहामारीच्या काळात सोशल डिस्टंसिंगचे नियम लक्षात घेता हे बदल केले जाण्याची शक्यता आहे. शारीरिक जवळीक दाखवण्यासंबधी काही नवे नियम आखण्यात आले असून या नियमांचा विचार करता संजय लीला भन्साळींंनी आलिया भट्ट आणि शांतनु माहेश्वरी यांच्यात शूट करण्यात आलेले काही इंटिमेट सीन फायनल एडिटींगमधून काढून टाकण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा: “एकतर ब्रा दाखव किंवा जॅकेट तरी”; क्रॉप टॉपमुळे ‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक उर्फी जावेद ट्रोल

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार सिनेमासंबंधित एका सूत्राने सांगितलं, “मला वाटतं या कठीण काळात नंतर माफी मागण्याऐवजी आधीच सुरक्षेचे नियम पाळणं कधीही योग्य. भंसाळी यांना फिजिकल इंटिमेसीपासून सावध राहवं लागेल. मात्र रोमॅण्टिक सीन दाखवण्यासाठी ते एखादा इतर मार्ग नक्कीच शोधतील.” असं सांगण्यात आलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

दरम्यान आलिया भट्टने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय. तसचं निर्मात्यांनी देखील सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा सिनेमा ओटीटीवर रिलीज न करण्याच्या निर्णयावर निर्माते ठाम असल्याने प्रेक्षकांना अजून काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sanjay leela bhansali will cut intimate seen of alia bhatt gangubai kathiyawadi kpw

ताज्या बातम्या