Sankarshan Karhade new project with Ashok Saraf : संकर्षण कऱ्हाडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेता सध्या त्याच्या नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. अभिनयासह तो लिखान आणि कवितासुद्धा करतो. यामुळेही अभिनेता चर्चेत असतो. संकर्षण सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.

संकर्षण कऱ्हाडेने आतापर्यंत अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे. अशातच आता तो मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर झळकणार असल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. संकर्षण कऱ्हाडे नेमकं काय म्हणाला याबद्दल जाणून घेऊयात…

संकर्षण अशोक सराफ यांच्याबरोबर करणार काम

आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती देताना संकर्षणने अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने, “द ग्रेट अशोक सरांसोबत मी काम केलं तर; आम्हाला दोघांना एकत्रं पहायला आवडेल का हो तुम्हाला…??? आधी तुम्ही खरं सांगा… मग मी तुम्हाला सगळं खरं खरं काय ते सांगतो… ” अशी कॅप्शन दिली आहे.

संकर्षणने यामधून नवीन प्रोजेक्टमधून तो अशोक सराफ यांच्याबरोबर झळकणार असल्याची माहिती त्याने यामधून दिली आहे. त्यामुळे आता या दोन कलाकारांना एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. संकर्षणच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टखाली कमेंट करत ते उत्सुक असल्याचंही म्हटलं आहे.

संकर्षणने नेहमीच त्याच्या कामातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. एकावेळी अभिनेता विविध माध्यमांत काम करत असतो. अशातच आता या नवीन कलाकृतीतून तो नेमका कोणत्या माध्यातून अशोक सराफ यांच्याबरोबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबद्दलची माहिती अद्याप त्याने दिलेली नाही.

अशोक सराफ यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अलीकडेच ते ‘कर्लस मराठी’वरील मालिकेत झळकले होते. यासह त्यांचा ‘पुन्हा साडे माडे तीन’ हा चित्रपटसुद्धा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्यामुळे आता ते कोणत्या नवीन कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं रंजक ठरेल.