Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेता त्याच्या नाटकांच्या प्रयोगामध्ये व्यग्र असतो. संकर्षण सोशल मीडियावरही खूप सक्रीय असतो आणि त्याच्या कामासंबंधीत व दैनदिन जीवनातील घडामोडी यामार्फत शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच आता त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
संकर्षण अनेकदा त्याच्या मुलांबरोबरचे आणि कुटुंबीयांबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतो. नुकताच त्याने त्याची दोन मुलं आणि बायकोबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. यामधून त्याने आधिक मासच्या निमित्ताने तो सासरी गेला होता आणि विमानातील मुलांबरोबर प्रवास करण्याचा अनुभव याबद्दल सांगितलं आहे.
संकर्षण काय म्हणाला?
संकर्षणने यावेळी त्याची दोन जुळी मुलं, बायकोबरोबरचा विमानातील फोटो शेअर करत त्याला ‘नागपुरला, सासरी जाऊन अधिक मासाच्या निमित्ताने धोंडे खाऊन आलो. विमानांत बसतांना काही मराठी लोक मला ओळखत होते, पण तासाभराच्या प्रवासांत माझ्या पोरांचे प्रताप अनुभवल्यावर मला पायलटसह सगळ्यांनी ओळख दाखवली’ अशी कॅप्शन दिली आहे.
संकर्षण अनेकदा त्याच्या मुलांबरोबरचे वेगवेगळे फोटो शेअर करत त्यामागचे किस्से सांगत असतो. तो त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही फोटो पोस्ट करत असतो. अभिनेता सोशल मीडियावर खूप सक्रीय असून अनेकदा तो त्याच्या कवितांमार्फत समाजात घडणाऱ्या घटनांबद्दल भाष्य करत असतो. राजकीय क्षेत्रातील नेते ते कलाकार अशी अनेक मंडळी त्याचं कौतुक करत असतात. त्याने केलेल्या कविता अनेकदा व्हायरल होत असतात. अभिनयाचा त्याला लिखानाचीही आवड असून अभिनेता असण्यासह तो लेखक, कवी आणि एक उत्तम निवेदकसुद्धा आहे.
दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेच्या प्रत्येक पोस्टखाली त्याचे चाहतेही कमेंट करत त्याला प्रतिसाद देत असतात. संकर्षणने त्याच्या अभिनयाने आणि मनमोकळ्या स्वभावामुळे अनेकांना आपलंसं केलं आहे. अनेक कलाकारसुद्धा त्याचं मुलाखतींमधून कौतुक करत असतात. संकर्षण अनेकदा नाटक, मालिका आणि चित्रपटत अशा विविध माध्यमांमध्ये एकत्र काम करताना दिसतो.
