अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१७ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच जोगेश्वरी येथील कमल अमरोही स्टुडियोमध्ये दिमाखात पार पडला. यात ‘कोडमंत्र’ या नाटकाने, तर ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाने बाजी मारली. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास असून, जीवन गौरव म्हणून मला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे,’ असे विजय चव्हाण यांनी सांगितले. ‘या पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. संस्कृती कलादर्पणचा हा पुरस्कार मिळाल्यानंतर आणखीन नऊ जीवनगौरव पुरस्कार घेणार आणि निवृत्त होणार,’ असा विनोद करत कार्यक्रमात जान आणली. तसेच रसिकांनी दिलेल्या अमाप प्रेमाबद्दल त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले.

Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
singer kartiki gaikwad father pandit kalyanji gaikwad awarded shri sant eknath maharaj swar martand from govind giri maharaj
कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा मानाच्या पुरस्काराने गौरव, पोस्ट करत म्हणाली, “हा पुरस्कार म्हणजे साक्षात…”
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
Vijay Bhatkar
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

संस्कृती कलादर्पण अध्यक्षासंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे व अध्यक्षा अर्चना नेवरेकर , स्मिता जयकर यांच्या हस्ते विजय चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. यांसोबतच संस्कृती कलादर्पण सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत मंडळी उपस्थित होती.

चिन्मय उदगीरकर आणि तितिक्षा तावडे या दोघांच्या खुमासदार सुत्रासंचालाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मालिका आणि चित्रपटांवर रंगलेल्या त्यांच्या जुगलबंदीवर उपस्थित पाहुण्यांनीदेखील भरभरून प्रतिसाद दिला. संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१७ च्या या वर्षी नाटक-चित्रपट आणि मालिका तसेच लघुचित्रपट अशा चार वेगवेगळ्या विभागात पुरस्कार देण्यात आले. त्यातील नाटक विभागात कोडमंत्र, चित्रपट विभागात व्हेंटिलेटर तसेच मालिका विभागात ‘सरस्वती’ आणि ‘दुहेरी’ या मालिकांनी सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळवला.

यावर्षी लघुचित्रपटासाठी पहिल्यांदाच झालेल्या स्पर्धेमध्ये ‘प्रदोष’ डी अंडर कव्हर गणेशा’ या लघुचित्रपटाने पहिले स्थान पटकावले. नाटक विभागातील सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना लेखक, सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता अशा चार पुरस्कारांवर ‘तीन पायांची शर्यत’ या नाटकाने आपले नाव कोरले. त्यानंतर ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘छडा’ या नाटकांनी देखील विविध विभागातून पुरस्कारांवर मोहर उमटवली. तसेच नाटक विभागामध्ये सर्वोत्कृष्ट लक्षवेधी म्हणून लीना भागवत (के दिल अभी भरा नही) आणि शरद पोंक्षे (हे राम नथुराम) यांचा सन्मान करण्यात आला.

चित्रपट विभागात लोकांच्या पसंतीला उतरलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पटकथा, दिग्दर्शक, खलनायक, सहाय्यक अभिनेता तसेच अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा ६ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. चित्रपट विभागातील विविध पुरस्कारांसाठी ‘कासव’ या चित्रपटाला विशेष लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ‘दशक्रिया’ या चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मालिका विभागात नीलकांती पाटेकर आणि सुलेखा तळवलकर यांना विभागून सर्वोक्तृष्ट सहाय्यक अभिनेत्रीने पुरस्कृत करण्यात आले. ‘सरस्वती’ आणि ‘दुहेरी’ या दोन मालिकांनी सर्वोत्कृष्ट होण्याचा मान पटकावला असून, तितिक्षा तावडे आणि उपेंद्र लिमये या कलाकारांनी सर्वोक्तृष्ट अभिनेत्री आणि अभिनेत्याचा मान पटकावला. तसेच अवधूत पुरोहित यांना सर्वोक्तुष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले.
संस्कृती कलादर्पण रजनी २०१७ नाट्य आणि चित्रपट पुरस्काराचे हे १७ वे वर्ष अनेक बाबींने विशेष ठरले. गेली १७ वर्षे होत असलेल्या सोहळ्याचा थाट यंदाही कायम होता. कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे सोहळ्याला चारचाँद लागले. त्यातील सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक यांच्या नृत्याविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झालेला दिसून आला.

नाटक विभाग

सर्वोत्कृष्ट नेपथ्य

१)     प्रसाद वालावलकर – कोडमंत्र

सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना

१)     भुषण देसाई – तीन पायांची शर्यत

सर्वोत्कृष्ट संगीत

१)     अशोक पत्की – साखर खालेल्ला माणूस

सर्वोत्कृष्ट लेखक

१)      अभिजित गुरु – तीन पायांची शर्यत

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

१)       राजेश जोशी – कोडमंत्र

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

१)      सुप्रिया पाठारे – या गोजिरवाण्या घरात

 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

१)      लोकेश गुप्ते – तीन पायांची शर्यत

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

१)      मुक्ता बर्वे – कोडमंत्र

सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागून

१)  सौरभ गोखले – छडा

२) संजय नार्वेकर – तीन पायांची शर्यत

सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री

१)     लीना भागवत – के दिल अभी भरा नही

सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता

१)      शरद पोंक्षे – हे राम नथुराम

सर्वोत्कृष्ट नाटक

१)      कोडमंत्र- अनामिका रसिका निर्मित

चित्रपट विभाग

सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक

१)     दत्ता लोंढे, किम टायगर- नातीखेळ

सर्वोत्कृष्ट संकलन

१)     रामेश्वर भगत – व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट छायांकन विभागून

१)     संजय मेमाणे – हाफ तिकिट

२)     धनंजय कुलकर्णी – कासव

सर्वोत्कृष्ट रंगभूषा

१)     संतोष गायके – हाफ तिकिट

सर्वोत्कृष्ट संगीत

१)     अमितराज- पोस्टर गर्ल

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका

१)     आनंदी जोशी  (एक सोहळा निराळा –फॅमिली कट्टा )

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

१)     आदर्श शिंदे (आवाज वाढव – पोस्टर गर्ल)

सर्वोत्कृष्ट गीतरचना विभागून

१)     सुनील सुकथनकर – कासव

२)     संजय कृष्णाजी पाटील – दशक्रिया

सर्वोत्कृष्ट संवाद

१)     सुमित्रा भावे – कासव

सर्वोत्कृष्ट पटकथा

१)     राजेश म्हापुसकर – व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट कथा  

१)     राजन खान – नातीखेळ

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

१)     राजेश म्हापुसकर – व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट बालकलाकार विभागून

१)     शुभम मोरे – हाफ तिकीट

२)     आर्य आढाव – दशक्रिया

३)     विनायक पोतदार – हाफ तिकीट

सर्वोत्कृष्ट खलनायक

१)     निलेश दिवेकर – व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

१)     सई ताम्हणकर – फॅमिली कट्टा

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

१)     आशुतोष गोवारीकर – व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागून

१)     प्रियंका बोस-कामत (हाफ तिकीट)

२)     सोनाली कुलकर्णी (पोस्टर गर्ल)

सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागून

१)     सुहास पळशीकर – माचीवरला बुधा

२)     जितेंद्र जोशी – व्हेंटिलेटर

सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट विभागून

१)     किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी – ओम प्रॉडक्शन

२)  कालचक्र – सेटलाईट पिक्चर्स

विशेष ज्युरी पुरस्कार

१)     दशक्रिया – रंगनील क्रिएशन

विशेष लक्षवेधी चित्रपट

१)     कासव – विचित्र निर्मिती

सर्वोत्कृष्ट चित्रपट

व्हेंटिलेटर- पर्पल पेबल पिक्चर्स प्रा.लि.

मालिका विभाग

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विभागून

१)     निलकांती पाटेकर (गोठ – स्टार प्रवाह)

२)     सुलेखा तळवलकर (सरस्वती – कलर्स)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विभागून

१)     शेखर फडके (सरस्वती – कलर्स)

२)     आंनद काळे (तुझ्यावाचून करमेना -कलर्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

१)     तितिक्षा तावडे (सरस्वती – कलर्स)

सर्वोत्कृष्ट अभिनेता

१)     उपेंद्र लीमये  (नकुशी – स्टार प्रवाह)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

१)    अवधुत पुरोहित (सरस्वती- कलर्स)

लक्षवेधी मालिका विभागून

१)     दर्शन – ( पर्पल पॅच मिडीया – कलर्स)

२)     नकुशी तरी हवी हवीशी ( सुमित प्रॉडक्शन- स्टार प्रवाह)

सर्वोत्कृष्ट मालिका

१)     सरस्वती (मिडीया मोक्स – कलर्स)

२)     दुहेरी (ड्रीमिंग 24 सेवन- स्टार प्रवाह )