‘दबंग ३’ मध्ये साकिब सलीम साकारणार ‘ही’ भूमिका

सलमान त्याच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेता साकिब सलीम याला पुन्हा एक संधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा ‘रेस ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘रेस ३’ ने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची कमाई केली असून हा चित्रपट २०० कोटी रुपयांचा गल्ला सहज पार करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘रेस ३’ प्रदर्शित झाल्यानंतर भाईजानने त्याचा मोर्चा अन्य प्रोजेक्ट्सकडे वळविला असून त्याच्या आगामी चित्रपटामध्ये तो अभिनेता साकिब सलीम याला पुन्हा एक संधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेला अभिनेता साकिब सलीम याने ‘रेस ३’  या चित्रपटामध्ये दमदार अभिनय करत चंदेरी दुनियेमध्ये आपले स्थान निश्चित केल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. कारण साकिबचा ‘रेस ३’ मधील अभिनय पाहून त्याच्याकडे काही चित्रपटांची विचारण्यात करण्यात आली असून आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटामध्येही त्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सलमानला ‘रेस ३’ मधील साकिबचा अभिनय आवडला असून तो त्याच्या आगामी ‘दबंग ३’ मध्ये साकिबला खलनायकाच्या भूमिकेमध्ये घेऊ इच्छित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘दबंग ३’ मध्ये साकिब खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसून आला तर वावगं ठरणार नाही.

दरम्यान, ‘दबंग ३’ मध्ये साकिबला घेण्याविषयी दिग्दर्शक अरबाज खानला विचारणा केली असता त्याने सध्यातरी चित्रपटाच्या कथेविषयी विचार सुरु आहे त्यामुळे चित्रपटामध्ये झळकणा-या स्टारकास्टच्या नावाची घोषणा ऑफिशली करण्यात येईल. मात्र सलमानच्या डोक्यात साकिबला घेण्याचा विचार सुरु असल्यामुळे ‘दबंग ३’ मध्ये तो खलनायकाची भूमिका साकारेल असं  एकंदरीत दिसून येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Saqib saleem may play the role of villain in dabangg