ड्रग्स प्रकरणी सारा, रकुल आणि श्रद्धा कपूर अडचणीत? समन्स बजावला जाण्याची शक्यता

ड्रग्स प्रकरणी रियासोबत एकूण १० जण अटकेत

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. यासोबत अभिनेत्री रकुल प्रीत आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांनाही जबाब नोंदववण्यासाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या आठवड्यात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून समन्स बजावला जाऊ शकते. या अभिनेत्री सुशांत सिंहसोबत लोणावळा येथील पार्टींमध्ये सहभागी असायच्या.

याआधी इंडिया टुडेने बोटमनने एनसीबीकडे सुशांत सिंह लोणावळा येथील फार्महाऊसवर पार्टी करायचा असा खुलासा केला होता. बोटमन जगदीश दास याने एनसीबीला माहिती देताना सांगितलं होतं की, सुशांत सिंह आपली कोअर टीम तसंच बॉलिवूडमधील खास मित्र रिया चक्रवर्ती, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि अटक करण्यात आलेला ड्रग्स तस्कर संशयित झाईद आणि इतरांसोबत पार्टी करायचा.

रिया चक्रवर्तीला अटक करण्यापूर्वी तीन दिवस तिची चौकशी करण्यात आली होती. रियाने आपण सुशांतसाठी ड्रग्सची व्यवस्था करत असल्याची कबुली दिली असून बॉलिवूडमधील काही मोठ्या सेलिब्रेटींची नावं घेतल्याचं सांगितलं जात आहे. रियाच्या व्हॉट्सअपवरील चॅटमधून ड्रग्ससंबंधी खुलासा झाला होता.

रिया चक्रवर्ती सध्या भायखळा जेलमध्ये आहे. एनसीबीकडून एकूण १० जणांना अटक करण्यात आलेली असून यामध्ये शौविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्यूअल मिरांडा, त्याचा स्टाफ, दिपेश सावंत, ड्रग्स तस्कर यांचा समावेश आहे. सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय तपास करत असून एनसीबी आणि ईडीदेखील ड्रग्स आणि पैशांच्या अव्यवहार प्रकरणी तपास करत आहे, १४ जून रोजी सुशांत सिंह मुंबईतील आपल्या राहत्या घऱी मृतावस्थेत आढळला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sara ali khan and shraddha kapoor to be summoned by ncb sushant singh rajput death case sgy

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या